डोंगरी नदी 
महाराष्ट्र

डोंगरी नदीत तरूण वाहिला; चाळीसगाव तालुक्‍यातील घटना

डोंगरी नदीत तरूण वाहिला; चाळीसगाव तालुक्‍यातील घटना

Rajesh Sonwane

चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव तालुक्‍यात पावसाने हाहाकार माजवला आहे. महिनाभरात पाचव्‍यांदा पुराचा वेढा पडल्‍याने चाळीसगाव शहरासह परिसरातील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. यातच मंगळवारच्‍या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांना पुर आला असून, आज सकाळी तरूण शेतात जात असतांना डोंगरी नदीत वाहून गेल्‍याची घटना घडली. सदर तरूणाचा शोध घेणे सुरू आहे. (jalgaon-news-Incidents-in-Chalisgaon-taluka-dongari-tanda-young-man-swam-in-the-dongari-river)

चाळीसगाव तालुक्यातील गोरखपूर तांडा येथील सोमनाथ रामजी राठोड (वय २५) हा तरूण सकाळी शेतात गेला. दरम्‍यान तो गावालगत असलेल्या डोंगरी नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना आज (२९ सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

अजूनही बेपत्‍ता

दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सोमनाथ राठोड या तरूणाचा तपास ग्रामस्थांकडून सुरू आहे. मात्र त्याचा थांग कुठेच लागलेला नाही. बेपत्ता झालेल्या तरूणासाठी शोध मोहीम सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT