Narayan Rane 
महाराष्ट्र

नारायण राणेंचा निषेध; जळगावात शिवसेनेने डुक्‍करांना बांधल्‍या राणेंच्‍या प्रतिमा

नारायण राणेंचा निषेध; जळगावात शिवसेनेने डुक्‍करांना बांधल्‍या राणेंच्‍या प्रतिमा

संजय महाजन

जळगाव : भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सोमवारी महाडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खालच्या स्थरांचे अपशब्द वापरत अवमान केला. त्याचे पडसाद उमटत असून जळगाव महानगर शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री राणे यांच्या विरोधात डुक्‍करांना प्रतिमा बांधून निषेध करण्यात आला. तसेच शिवसैनिकांकडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे. (jalgaon-news-Image-of-Rane-tied-by-Shiv-Sena-to-pigs-in-Jalgaon)

राज्यामध्ये सर्वत्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात निषेध नोंदवला जात आहे. वेगवेगळ्या घोषणाबाजी नारायण राणेंच्या विरोधात केले जाताहेत. नारायण राणे यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी सुद्धा राज्यांमधील शिवसैनिक आक्रमक होऊन नारायण राणे यांच्या विरोधामध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी गुन्‍हा दाखल करण्यात आले असून जळगावात देखील याची गुन्‍हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

डुकरांना लावल्‍या राणे परिवाराच्‍या प्रतिमा

राज्‍यात नारायण राणे यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध नोंदविला जात असून, ठिकठिकाणी शिवसैनिक आक्रमक होत असल्‍याचे पाहण्यास मिळत आहे. त्‍यानुसार शिवसेना जळगाव महानगरच्‍यावतीने शहरातील टावर चौकात आंदोलन करण्यात आले. येथे शिवसैनिकांनी डुक्‍कर आणत त्‍यास नारायण राणे यांच्‍यासह त्‍यांच्‍या मुलांच्‍या प्रतिमा बांधून निषेध करण्यात आला. राणे यांचे राजकारण हे डुक्‍करांप्रमाणे गलिच्‍छ असल्‍याचे यातून दाखविण्यात आल्‍याचे गजानन मालपुरे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: पैशाचं नियोजन करा अन्यथा...या राशींच्या व्यक्तींना बसणार आर्थिक फटका, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या शेंदूरसणीत आढळलेल्या जन्म-मृत्यू अवैध नोंदींची चौकशी होणार

Muncipal Elections : 'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं!'...काँग्रेस-शिवसेना आघाडी झाली रं...

Konkan Travel : कोकणातील बारमाही वाहणारा धबधबा, 'हे' आहे पर्यटकांचे आकर्षण

Corporation Elections: ठाकरे बंधूंची युती होताच एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; शिवसेनेच्या 40 शिलेदारांना दिली मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT