Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

अवैध धंद्यांवर वक्रदृष्टी; दोन दिवसात १ लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्‍त

अवैध धंद्यांवर वक्रदृष्टी; दोन दिवसात १ लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्‍त

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी अवैध धंद्यांवर करडी नजर टाकत तब्बल एक लाखाच्यावर मुद्देमाल जप्त केला आहे. त्‍यानुसार आज रत्नापिंप्री येथील रॉयल गार्डन हॉटेल येथे अमोल नागराज शिंदे हे अवैध दारूविक्री करत (Jalgaon News) असल्‍याची माहिती मिळाली. तेथे छापा टाकत कारवाई केली. (jalgaon news illegal trades More than one lakh items seized in two days)

रत्‍नापिंप्री येथे पोलिसांनी (Police) छापा टाकत दारूसाठा जप्‍त केला. साधारण 7 हजार 630 रुपयांचा माल मिळून आला. तसेच अमळनेर पारोळा रोडवरील भिलाली फाट्याजवळ शिवार हॉटेलजवळ वसंत भाऊराव मराठे यांचे ताब्यात एकूण 4 हजार 530 -रुपयांची इंग्लिश व देशी दारू मिळून आली आहे. सदरची कारवाई पो नि रामदास वाकोडे, पो नि किरणकुमार बकाले यांचे मार्गदर्शनाखाली हवलदार विनोद साळी, सुनील वानखेडे, संदीप सातपुते, हवलदार राहुल पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, स्थानिक गुन्हये शाखा अशी दोन छापे टाकून संयुक्त कारवाई केली आहे.

सात अवैध दारूभट्टी उद्‌ध्‍वस्‍त

पोलीस पथकाने वरील एकूण सात अवैध दारुभट्टी व विक्री करणार हॉटेल मालकावर कारवाई करून एकूण 1 लाख 16 हजार 175 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. दारुभट्टी वाले व देशी व विदेशी दारू विकणारे हॉटेल मालक,चालक यांचेवर गुन्हये दाखल करून कारवाई केलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT