Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: प्रेयसीसोबत नवऱ्याला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले, संतापलेल्या बायकोनं असं काही केलं की...

प्रेयसीसोबत पती; पत्नीने दोघांनाही दिला चोप

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : रविवारची सुटी असतानाही महाविद्यालयात कामानिमित्‍ताने जात असल्‍याचे सांगून घरून गेलेल्या पतीला पत्नीने प्रेयसीसोबत नाश्‍ता करताना (Jalgaon) पकडले. यानंतर संताप अनावर झालेल्‍या पत्‍नीने दोघांना चोप देत पोलीस ठाण्यात हजर केले. (Jalgaon Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण हा शिरसोली रस्त्यावरील एका महाविद्यालयात नोकरीला आहे. रविवारची सुट्टी असतानाही तो महाविद्यालयात जायचे असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. यानंतर पती महाविद्यालयाच्‍या आवारात असलेल्‍या रेस्टॉरंटमध्ये प्रेयसीसोबत नाश्‍ता करत बसला होता. याबाबतची माहिती पत्नीला मिळाल्‍यानंतर तिने भावाला सोबत घेत रेस्टॉरंट गाठत पत्नीने दोघांच्या कानशिलात लगावली.

अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

निर्भया पथक स्‍पॉटवर दाखल होत सर्वांना एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात नेले. तिथे ठाणे अंमलदार रामकृष्ण पाटील यांनी पती- पत्नी आणि प्रेयसी असे तिघांचे म्हणणे ऐकून घेत प्रेयसीच्या आई- वडिलांनाही पोलीस ठाण्यात बोलावले.

प्रेयसीला तिच्या आई- वडिलांच्या तर प्रियकराला मेहुण्याच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेच्या संदर्भात पत्नीने पती व प्रेयसीविरुद्ध तक्रार दिली असून त्यानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास समाधान टहाकळे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिस ठाण्यासमोरच दोन गट भिडले...

Budh Ast: 9 दिवसांत या राशींना मिळणार मोठी गुड न्यूज; बुधाच्या अस्तामुळे येणार अच्छे दिन

Famous Singer Death: संगीतविश्वाला मोठा धक्का; ज्येष्ठ गायकाचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Yograj Singh: क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील अडचणीत; पोलिसात FIR दाखल

भाजपच्या माजी आमदाराला सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका, जन्मठेपेची शिक्षा ठेवली कायम

SCROLL FOR NEXT