corona vaccination 
महाराष्ट्र

लसीकरणाचे महिनाभरात १०० टक्के लक्ष्य; घरोघरी जाऊन लस

लसीकरणाचे महिनाभरात १०० टक्के लक्ष्य; घरोघरी जाऊन लस

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : देशभरात लसीकरणाने शंभर कोटींचा टप्पा गाठल्यानंतर आता घरोघरी जाऊन शंभर टक्के लसीकरणाचे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी जिल्हा कोविड लसीकरण टास्क फोर्सच्या बुधवारी (ता. ३) झालेल्या बैठकीत सूचना देण्यात आल्या. या महिनाभरात पात्र सर्व लाभार्थी व महाविद्यालयांमध्येही मोहीम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. (jalgaon-news-hundred-percent-target-within-a-month-corona-Vaccination-from-door-to-door)

जिल्हाधिकारी तथा टास्क फोर्सचे अध्यक्ष अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीत विविध मुद्द्यांच्या आधारे आढावा घेण्यात आला व त्यासंबंधी सूचना करण्यात आल्या.

या दिल्या सूचना

२० दिवसांच्या आत फ्रंटलाइन वर्कर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करावे. खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करून प्रमाणपत्र द्यावे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्या- त्या गावात, वॉर्डात घरोघरी जाऊन एकही लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. ४५ वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करावे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, हॉस्पिटल, वैद्यकीय महाविद्यालयांत लसीकरण पूर्ण करावे. महाविद्यालये सुरू झाल्यामुळे आता दिवाळीनंतर १५, १६ व १७ नोव्हेंबरला लसीकरण मोहीम राबवून विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण करावे. ग्रामीण व शहरी भागातील नागरिक कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांच्यासाठी सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत लसीकरण उपलब्ध करून द्यावे. पेट्रोल, डिझेल, रेशन घेण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे अनिवार्य करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

लस न घेतल्यास वेतन रोखण्याचे आदेश

जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक आहे. किमान एक मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र सर्व शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी प्राप्त करून घेतल्यानंतरच नोव्हेंबरचे वेतन देयक अदा करावे. लसीची एकही मात्रा घेतलेली नाही, अशा कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करू नये, असे आदेश श्री. राऊत यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT