hsc result 
महाराष्ट्र

HSC Result : नाशिक विभागात नंदुरबारची बाजी; जळगाव शेवटच्‍या स्‍थानी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर यंदा बारावी परीक्षा रद्द झाली होती. मात्र बारावीचे अंतर्गत मुल्यमापन तसेच दहावी व अकरावीच्या गुणांच्या आधारे यंदा बारावीचा निकाल तयार करण्यात आला आहे. त्‍यानुसार आज (ता.३) दुपारी चारला ऑनलाइन निकाल जाहीर केला.

Rajesh Sonwane

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (पुणे) बारावीचा निकाल आज दुपारी ऑनलाइन जाहीर झाला. नाशिक विभागातून यंदा नंदुरबार जिल्‍हा निकालाच्‍या टक्‍केवारीत विभागातून प्रथम क्रमांकावर आहे. विभागातून नंदुरबार जिल्‍हा बारावी निकाल ९९.८२ टक्‍के तर जळगाव जिल्‍ह्याचा निकाल ९९.५४ टक्‍के लागला. (jalgaon-news-hsc-online-result-nandurbar-district-top-in-nashik-divison)

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर यंदा बारावी परीक्षा रद्द झाली होती. मात्र बारावीचे अंतर्गत मुल्यमापन तसेच दहावी व अकरावीच्या गुणांच्या आधारे यंदा बारावीचा निकाल तयार करण्यात आला आहे. त्‍यानुसार आज (ता.३) दुपारी चारला ऑनलाइन निकाल जाहीर केला. या निकालात नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश असून, नाशिक विभागातून नंदुरबार जिल्ह्याचा सर्वाधिक निकाल लागला आहे. नाशिक विभागातून यंदा एक लाख ५१ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी एक लाख ५१ हजार १७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाशिक विभागाच्या निकालाची टक्‍केवारी ९९.६१ टक्‍के असून गतवर्षीच्‍या तुलनेत अकरा टक्‍क्‍यांनी अधिक आहे.

जळगावचा निकाल ९९.५४ टक्‍के

जळगाव जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९९.५४ टक्के निकाल लागला आहे. जळगाव जिल्ह्यातून ४५ हजार ३५७ विद्यार्थी प्रवेशित होते. त्यापैकी ४५ हजार १५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, २०७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये २५ हजार ८२६ मुले तर १९ हजार ३२४ मुलींचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, चाळीसगाव आणि जळगाव शहर वगळता अन्य तालुक्यांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

नाशिक विभागाचा बारावीचा निकाल

जिल्हा...... प्रविष्ट विद्यार्थी...... उत्तीर्ण विद्यार्थी.......टक्केवारी

नाशिक......६८ हजार ५१६....६८ हजार २२३.....९९.५७

धुळे........ २२ हजार ५९९.....२२ हजार ५४४....९९.७५

जळगाव.....४५ हजार ३५७.....४५ हजार १५०.....९९.५४

नंदुरबार......१५ हजार २८२.....१५ हजार २५६.....९९.६१

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alzheimer: अल्झायमर का होतो? सुरुवातीची लक्षणे नेमकी कोणती?

Maharashtra Live News Update: बैलगाडा स्पर्धेत 'कार्तिक आणि बकासुर' ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी

संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, तिकडे काश्मीरमध्ये ऑपरेशन महादेव; पहलगाम हल्ल्याचा बदला, मास्टरमाइंडचा खात्मा

Nandurbar : पंचायत समिती इमारतीच्या भूमीपूजनावरून श्रेयवादाची लढाई; भाजप- शिवसेना आमने सामने

Income Tax Return: सोशल मीडियावर कमाई करणाऱ्यांना किती द्यावा लागतो टॅक्स? कोणता ITR फॉर्म भरावा लागतो?

SCROLL FOR NEXT