Chalisgaon Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain: चाळीसगावात मुसळधार पाऊस; तितूर- डोंगरी नद्यांना पूर

चाळीसगावात मुसळधार पाऊस; तितूर- डोंगरी नद्यांना पूर

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : मागील काही तासांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे चाळीसगाव (Chaigaon) शहरातून वाहणाऱ्या तितूर-डोंगरी नद्यांना पूर आला आहे. शहरातील मोठा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (Chalisgaon Heavy Rain)

मागील वर्षी शहरासह तालुक्यात ३० ऑगस्टच्या मध्यरात्री अचानक (Heavy Rain) अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने क्षणात होत्‍याचे नव्हते केले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांच्या घरांसह जनावरे वाहून गेली. तर शेतकऱ्यांच्या (Farmer) हातातोंडाशी आलेला घास हिराहून नेला होता. शहरातून वाहणाऱ्या तितूर-डोंगरी नद्यांना गत वर्षी तब्बल ७ वेळा पूर आला. या पुराचा पाणी अनेकांच्या घरात घुसला होता.

मोठा पुल पाण्याखाली

यानंतर परतीच्‍या मुसळधार पावसाने गुरुवारी (६ ऑक्‍टोंबर) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा तितूर-डोंगरी नद्यांना पूर आला आहे. शहरातील मोठा पूल देखील पाण्याखाली गेला असून पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होता. यामुळे गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहे. पावसाने जोर वाढल्‍यास वित्तहानीसह जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावधान राहावा असा इशारा नागरपालिकेसह प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

Pitod Recipe : भाजी संपलीय? मग झटपट बनवा खमंग 'पितोड', चवीला लागेल भन्नाट

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांना झटका, सुप्रीम कोर्टाने बजवली नोटीस

SCROLL FOR NEXT