Chalisgaon Heavy Rain Saam Tv
महाराष्ट्र

Heavy Rain: चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, पिकेही गेली पाण्याखाली

चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, पिकेही गेली पाण्याखाली

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : गेल्या चार– पाच दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे खरीपांच्या पिके पाण्याखाली गेली आहेत. पाऊस (Rain) सुरू राहीला तर खरीपाच्या पिकांवर पाणी फिरणार आहे. शिवाय रविवारी (ता.१८) रात्री आठ वाजेपासून सुरू झालेला पाऊस आज सोमवारी दिवसभर कोसळतच होता. त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Jalgaon News Chalisgaon Heavy Rain)

Chalisgaon Heavy Rain

गिरणा पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Chalisgaon Heavy Rain) गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आल्याने त्यातून 29 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत सोडले जात असल्याने गिरणाने (Girna River) रौद्र रूप धारण केले आहे. यावर्षी गिरणा नदी संपूर्ण पावसाळ्यात पहिल्यांदाच दुथडी वाहत आहे. तर पाटणा भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) तितूर नदीला देखील मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदीनाले प्रथमच ओसांडून वाहू लागले आहेत.

तालुक्यात विक्रमी पाऊस

गेल्या आठ– दहा दिवसात तालुक्‍यात विक्रमी पाऊस झाला असून या पावसाने पिकांची अतोनात हानी झाली आहे. पावसामुळे नद्या-नाले पात्र सोडून वाहू लागले असून शेतांमध्ये पाणी साचले. काही ठिकाणी तर जमिनी उखळल्याने पिके पाण्यात आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला खरीप हंगामाला मोठा फटका बसणार आहे.

वाहतुक ठप्प

दरम्यान रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आले आहेत. मेहूणबारे येथे भराडी नाला तसेच जामदा व गुढे गावाजवळील नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने येवला- एरंडोल मार्गावर आज सकाळी दोन ते तीन तास वाहतुक ठप्प झाली होती. गुढे- बहाळ, खेडगाव- बहाळ व चाळीसगाव- बहाळ असा संपर्क तुटला होता. दुपारी पाण्याचा जोर कमी झाल्यानंतर नाल्यांचे पाणी कमी होवून वाहतुक पूर्ववत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT