Hatnur Dam Saam tv
महाराष्ट्र

Hatnur Dam : हतनूर धरणाचे १६ दरवाजे खुले; ५० हजार क्यूसेकने विसर्ग

हतनूर धरणाचे १६ दरवाजे खुले; ५० हजार क्यूसेकने विसर्ग

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने तापी, पूर्णा नदीला पूर आला असून, धरणाची (Jalgaon News) पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे गुरुवारी (१३ जुलै) सायंकाळी धरणाचे १६ दरवाजे प्रत्येकी दीड मीटरने (Hatnur Dam) उघडण्यात आले. धरणातून सध्या ५० हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून, तो वाढण्याची शक्यता लक्षात घेता तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, पूर्णा व तापी नदीक्षेत्रात सातत्याने चांगला पाऊस होत आहे. मध्य प्रदेश व विदर्भातील पावसामुळे या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे हतनूर धरणाच्या जलपातळीत मोठी वाढत होत आहे. परिणामी, धरणाचे ४१ पैकी १६ दरवाजे प्रत्येकी दीड मीटरने उघडले आहेत. त्यातून सध्या ४९ हजार ७२४ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

विसर्ग वाढण्याची शक्यता

दरम्यान, धरणाच्या पाणीपातळीत (Rain) सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असून, तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणाचे दरवाजे खुले असल्याने नागरिकांनी नदीपात्रालगत जाऊ नये, गुराढोरांनाही त्यापासून दूर ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oral Health : तोंडातून वास येतोय? मग हे 5 उपाय नक्की कराच

Cabinet Decisions : २५ मोठ्या योजनांचं काय होणार? वर्षभरात ठरणार; फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Heart Attack : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका होईल कमी, डाएटमध्ये आजपासून समावेश करा 'या' ३ भाज्यांचा

Vastu Tips Of Furniture Placement: घरात फर्निचरची मांडणी करताना 5 महत्वाच्या वास्तू टिप्स

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

SCROLL FOR NEXT