Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: भावी पत्‍नीशी व्हिडिओ कॉलवर बोलतच घेतला गळफास; पुढच्‍या महिन्‍यात होते लग्‍न

भावी पत्‍नीशी व्हिडिओ कॉलवर बोलतच घेतला गळफास; पुढच्‍या महिन्‍यात होते लग्‍न

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सहजीवनाचे स्वप्न रंगवत लग्नाचे दिवस मोजत असतानाच सिंधी कॉलनीतील तरुणाने होणाऱ्या (Jalgaon News) पत्नीला व्हिडिओ कॉल करून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Live Marathi News)

कितेश गौतम बागडे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. जळगाव शहरातील सिंधी कॉलनीजवळील नाथवाडा येथे कितेश बागडे हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. नेहमीप्रमाणे रात्री नऊला तो भावी पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होता. कॉल सुरू असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कितेशची आई गुड्डी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हंबरडा फोडला.

महिनाभरात होते लग्‍न

शेजारी राहणाऱ्या तरुणांनी धाव घेऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी मृत घोषित केले. येत्या महिन्यात (ता. २७ मे) कितेशचे लग्न होणार होते. परंतु त्याने टोकाचे निर्णय घेतल्याने बागडे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. मृताच्या पश्चात आई गुड्डी, वडील गौतम बागडे, लहान भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT