Gulabrao Patil Saam tv
महाराष्ट्र

Gulabrao Patil: शरद पवारांच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार, महाभुकंप होणारच; मंत्री गुलाबराव पाटील

शरद पवारांच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार, महाभुकंप होणारच; मंत्री गुलाबराव पाटील

संजय महाजन

जळगाव : पक्ष फुटतोय असे कोण म्‍हणेल. शरद पवारांच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार. ते मोठे नेते आहेत. असं म्‍हटले जाते की (Sharad Pawar) शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध घडतं; हे मी म्‍हणू शकत नाही. ते मोठे व्‍यक्‍ती असून त्‍यांच्‍याबद्दल बोलणे उचित नाही, असे वक्‍तव्‍य पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आज माध्‍यमांशी बोलताना केले. (Tajya Batmya)

राज्‍यात सध्‍या सुरू असलेल्‍या राजकीय वातावरणाबद्दलच्‍या प्रकरणावर प्रतिक्रीया देताना गुलाबराव पाटील माध्‍यमांशी बोलत होते. राज्‍यात सुरू असलेल्‍या राजकीय भुकंपाबाबत बोलताना त्‍यांनी सांगितले, की सध्‍या होत असलेल्‍या चर्चांमध्‍ये तथ्‍य आहे. भुकंप नव्‍हे तर महाभुकंप होईल; असे संकेतच त्‍यांनी यावेळी दिले.

राष्ट्रवादी ढगाळ वातावरण

राष्‍ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपमध्‍ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. याबाबत बोलताना त्‍यांनी सांगितले, की प्रत्‍येकजण आपले भवितव्‍य पाहून निर्णय घेईल. यामुळे होत असलेल्‍या चर्चांमध्‍ये तथ्‍य असून राजकीय महाभुकंप होईल व अजित पवार हे भाजपमध्‍ये जाणे अटळ असल्‍याचे पाटील यांनी सांगितले. यापुढे राज्याचे चित्र वेगळं असेल. यापुढे येणारा काळ भाजपा शिवसेनेचा असेल; असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT