Gulabrao Patil Sanjay Raut Saam tv
महाराष्ट्र

Gulabrao Patil Statement: संजय राऊत यांची त्या कृत्यावरून संस्कृती कळतेय; गुलाबराव पाटील यांचा हल्लाबोल

कृत्‍यावरून राऊतांची संस्‍कृती कळतेय; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

संजय महाजन

जळगाव : संजय राऊत यांच्या कृत्यावरून त्यांची संस्कृती किती खालच्या पातळीची आहे हे कळतेय. राऊत (Sanjay Raut) यांचं डोकं फिरलं आहे. त्यांच्यासाठी ठाण्याच्या मनोरुग्णालयात बेड वाढवले आहेत; अशा शब्दात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. (Breaking Marathi News)

संजय राऊत यांना खासदार श्रीकांत शिंदेंविषयी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी श्रीकांत शिंदेंचे नाव ऐकताच राऊतांनी थुंकलं होतं. त्यांचा ऑन कॅमेरा थुंकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यांच्या या कृत्यावरून राज्याचं राजकारण तापलेलं दिसत आहे. राऊत यांच्‍या थुंकल्‍याच्‍या प्रकारावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात आपली प्रतिक्रीया दिली आहे.

लाज असेल तर राजीनामा द्या

ज्या ४१ आमदारांनी संजय राऊत यांना मतदान करून राज्यसभेवर पाठवले. त्यांच्या नावाने थुंकताहेत. त्यामुळे संजय राऊत यांना थोडी जरी (Jalgaon) लाज शरम असेल, तर त्यांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा; अशी मागणी देखील गुलाबराव पाटील यांनी बोलताना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या फुटलेल्या खासदाराची मुलगी मातोश्रीवर दाखल; पडद्यामागे काय घडतंय? VIDEO

प्रायव्हेट पार्टजवळ सतत खाज आणि जळजळ होतेय? मग 'हे' घरगुती 5 उपाय करून पाहा

Maharashtra News Live Update: रायगडच्या महाडमध्ये जोरदार पाऊस

Tomato Tips : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

SCROLL FOR NEXT