Gulabrao Patil Unmesh Patil 
महाराष्ट्र

खासदारांनी माझ्या नादी लागू नये; गुलाबराव पाटलांचे उन्मेष पाटील यांना प्रत्युत्तर

खासदारांनी माझ्या नादी लागू नये; गुलाबराव पाटलांचे उन्मेष पाटील यांना प्रत्युत्तर

संजय महाजन

जळगाव : जळगावतील राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. जिल्‍ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांची एकमेकांवर जोरदार टीका सुरू आहे. गिरणा परिक्रमेच्या सुरुवातीलाच खासदार उन्मेष पाटल यांनी वाळू चोरीच्या मुद्द्यावर बोलताना कुंपणच शेत खातेय असे म्‍हणत गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्‍यावर निशाणा साधला होता. यावर खासदारांनी माझ्या नादी लागू नये; असे प्रत्‍युत्‍तर गुलाबराव पाटील यांनी दिले. (jalgaon news Gulabrao Patil reply to mp Unmesh patil statement)

पालक या शब्दाचा अर्थ समजून घेतला असता तर या बाबी समोर आल्या असत्या. कुंपणच शेत खात असेल तर व्यथा कुणाकडे मांडायाच्या अशी भावना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या बाबतीत लोकांमधून आवाज उठवता येईल. पालकमंत्र्यांना बारा महिने झाले आहेत तरी बैठक घ्यायला वेळ नाही. तर, कोरोना लसीकरण (Corona Vaccination) झालेले आहे. त्यामुळे आम्ही यासंदर्भात आवाज उठवता येतो का हे पाहणार असल्‍याचे उन्मेष पाटील म्हणाले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन वाळू चोरीच्या मुद्यावर लोकांच्यामधून आवाज उठवणार आहे. पालकमत्र्यांनी ठरवले तर त्यांच्यासाठी ही छोटी बाब आहे, असे उन्मेष पाटील यांनी म्हटले आहे.

वाळू माफिया कोणत्या पक्षाचे ते पहा

वाळू उपशाचा प्रश्न आता निर्माण झालेला नाही. वाळू माफियामध्ये चेतन शर्मा कोणत्या पक्षाचे होते हे खासदारांनी पाहावे, असं प्रत्‍युत्‍तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. वाळू माफियामध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे आणि सर्व पक्षाचे लोक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT