Gulabrao Patil Aaditya Thackeray Saam tv
महाराष्ट्र

यासारखे दुर्दैव नाही, आधीच दौरे केले असते तर ही वेळ आली नसती; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला

यासारखे दुर्दैव नाही, आधीच दौरे केले असते तर ही वेळ आली नसती; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावे लागत आहे. यासारखे दुसरे दुर्दैव नाही. उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी आधीच हे दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती; असा टोला मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लगावला आहे. (Jalgaon News Gulabrao Patil)

राज्‍यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्‍यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार गेले आहेत. यासोबतच नगरपालिका, महापालिकेतील नगरसेवक यांच्‍यासमवेत कार्यकर्ते देखील शिंदे गटात येत आहेत. यामुळे शिवसेना (Shiv Sena) वाचावी याकरीता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व आदित्‍य ठाकरे शिवसेना शाखांवर दौरे करत आहेत. याबाबत माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्‍तव्‍य केले आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आजारी होते. मात्र आदित्‍य ठाकरे हे तर तरुण होते. आता संपूर्ण राज्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दौरे करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी आधीच सर्व जिल्ह्यांचे दौरे केले असते; तर कदाचित आज ही वेळ आली नसती. असा टोला शिंदे गटात सहभागी झालेले जळगाव जिल्ह्याचे माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT