JDCC Bank Gulabrao Devkar Saam tv
महाराष्ट्र

JDCC Bank: गुलाबराव देवकर यांचा जिल्‍हा बँकेच्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा

गुलाबराव देवकर यांचा जिल्‍हा बँकेच्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेचे अध्‍यक्ष असलेले (NCP) राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी बँकेच्या (JDCC Bank) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तसेच श्यामकांत सोनवणे यांनी देखील उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. (Maharashtra News)

जळगाव जिल्‍हा बँकेवर महाविकास आघाडी- शिवसेना (शिंदे गट) यांची सत्ता आहे. निवडणुकीनंतर एका वर्षासाठी पद वाटपाचा निर्णय झाला होता. त्यानुसार गुलाबराव देवकर आणि श्‍यामकांत सोनवणे यांना अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवड झाली होती. दोघांचाही वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दोघांनी राजीनामे देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत झाला होता.

आज दिले राजीनामे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देवकर हे आपल्या पदाचा राजीनामा देतील; असे शुक्रवारी सांगितले होते. त्यानुसार आज सकाळी दहा वाजता अध्यक्ष गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. या वेळी माजी संचालक वाल्मिक पाटील होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्यवसाय क्षेत्रात एन्ट्री; मुंबईजवळ सुरू केले हॉटेल, VIDEO चर्चेत

High Blood Pressure: रक्तदाब वाढण्यामागे फक्त मीठच नाही, या ६ चुका रोज करत असाल तर हृदयावर वाढतो मोठा ताण

धक्कादायक! कल्याणमध्ये महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 20 पीडितांची सुटका

SCROLL FOR NEXT