Gulabrao Patil 
महाराष्ट्र

मोर्चा कसा काढवा याची प्रॅक्टीस भाजपने करावी; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढला चिमटा

मोर्चा कसा काढवा याची प्रॅक्टीस भाजपने करावी; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढला चिमटा

संजय महाजन

जळगाव : भाजप येत्‍या १ नोव्हेंबरला ज्या मागण्यासाठी जळगाव जिल्ह्यात मोर्चा काढत आहे. त्यातील सर्व मागण्या शासनाने पुर्ण केल्या आहेत. त्यांच्या मोर्चाला अर्थ नाही. मात्र भाजपने मोर्चा जरूर काढावा. मोर्चा कसा काढतात याची प्रॅक्टीस भाजपने करावी. विरोधी पक्ष आहे तो त्यांचे काम त्यांनी केले पाहिजे. (jalgaon-news-Guardian-Minister-Gulabrao-Patil-target-BJP-should-practice-how-to-form-a-morcha)

जळगाव जिल्‍ह्याचा अतीवृष्टीग्रस्त जिल्ह्याच्या मदत यादीत सामावेश नसल्याबाबत ‘भाजप’ने कांगावा केला होता. स्‍वतः कॅबिनेटच्या बैठकीत बसून अतीवृष्टीग्रस्तांच्या मदत यादीत जळगावचे नाव टाकून घेतले आहे. जिल्‍ह्यात नुकसान झाले असेल अन्‌ त्यात जळगावचे नाव नसेल असे होणार नाही. गुलाबराव पाटील येथे बसला आहे. जळगावचे नाव वगळण्याची कोणाची हिम्मत? असेही पाटील म्‍हणाले

जिल्‍ह्याला चारशे कोटींचा निधी

जिल्ह्याच्या विकासा कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्‍ह्याला ४०० कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. त्यात यंदाचे वर्ष व पुढील वर्षात करावयाची कामांचे नियेाजन आज झाले. विकास कामे करण्यापूर्वी धोरणात्मक निर्णय होण्यासाठी आज जिल्हा नियेाजन समितीची आढावा बैठक घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. पुढील वर्षाच्या विकास कामांची आखणी त्यात करण्यात आली. पूर्व नियोजीत बैठक घेतल्याशिवाय विकास कामांना गती येणार नसल्याने बैठक झाली.

शेतकऱ्यांनी एक महिन्याचे बिल भरावे

शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन जोडण्यासाठी फक्त एका महिन्याचे बिल भरण्याचे आदेशाही काल कॅबिनेटच्या बैठकीत काढून घेतले आहे. शेतकऱ्यांनी केवळ चालू महिन्याचे बिल भरावे. तशा सूचना विज कंपनीला देण्यात आल्या. आज अनेकांची विज संयोजन सूरू झाले असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT