Gold Silver Price Saam tv
महाराष्ट्र

सोने– चांदीच्‍या दरात वाढ; युद्धाचा मार्केटवर परिणाम

सोने– चांदीच्‍या दरात वाढ; युद्धाचा मार्केटवर परिणाम

संजय महाजन

जळगाव : रशिया व युक्रेनमध्ये युध्द सुरू आहे. याचा परिणाम सोने, चांदीच्या बाजारावर झाला आहे. युध्दामुळे सोने, चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज तर चांदीचे दर ७१ हजारांवर (प्रतिकिलो) पोचले आहे. तर सोने ५५ हजार ४०० इतके झाले आहे. या आठवड्यात सोने (Gold) तीन हजार व चांदी पाच हजाराने हजारांनी महागले आहे. (jalgaon news Gold and silver prices rise effects of the war on the market)

रशिया व युक्रेनमधील युद्धाचा (Russia Ukraine War) परिणाम शेअर बाजाराबरोबरच तेल, सोने, चांदी आदी वस्तूवर होत असून त्यांच्या किंमती वाढतच आहे. युद्धामुळे चांदीचा (Silver) प्रतिकिलो दर ६३ ते ६४ हजार असा होता. तो आज ७१ हजारावर पोचला आहे. चांदी पाच हजार महाग तर सोन्याच्या दरातही तब्बल तीन हजारांची वाढ झाली आहे. युध्द कालावधीत आतापर्यंत झाली आहे. आज सोन्याचा दर ५५ हजार ४०० प्रतितोळा (दहा ग्रॅम) आहे.

गुंतवणूक म्‍हणून खरेदी थांबली

गुंतवणूक म्‍हणून खरेदी केले जाणारे सोने, चांदीचे दागिन्‍यांचे मार्केटमधील तेजी सध्‍या कमी झाली आहे. वाढत्‍या दरामुळे खरेदी करणारे चक्रावले आहेत. काहींनी दरवाढीचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी सोने, चांदीचे दागिन्‍यांची मोड करत असल्‍याचे चित्र सध्‍या सोने बाजारात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT