महाराष्ट्र

गिरणा धरणाची शंभरी; सात गेटमधून साडेसात हजार क्युसेकने विसर्ग

गिरणा धरणाची शंभरी; सात गेटमधून साडेसात हजार क्युसेकने विसर्ग

साम टिव्ही ब्युरो

भडगाव (जळगाव) : गिरणा धरणाने सलग तिसऱ्या वर्षी शंभरी गाठली. त्यामुळे गिरणा पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळाले. सकाळी सात वाजता धरणाने शंभरी गाठली. सध्या धरणातुन 7500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे उपविभागीय अभियंता हेमंत पाटील यांनी सांगीतले. (Jalgaon-news-girna-dam-water-lavel-hundred-parcantag-full-morning-sevan-get-open)

गिरणा धरणाने आज सकाळी सात वाजता शंभरी गाठली. पाणलोट क्षेत्रातील धरणातुन मोठ्याप्रमाणात पाण्याची आवक असल्याने रात्रीतुन धरणात तब्बल 6 टक्के पाण्याचा साठा वाढला. सात वाजता सुरवातीला चार गेट एका फुटाने वर करत पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र पुन्हा धरणात पाण्याची आवक वाढल्याने सात दरवाज्यातुन साडेसात हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ज सुरु करण्यात आला. तर मन्याड प्रकल्पातुन साधारण 10 हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग

गिरणा नदी पात्रात साडे सतरा हजाराच्या जवळपास क्युसेकने पाण्याचा फ्लो सुरू आहे. त्यामुळे नागरीकांनी सतर्क राहावे, नदि काठी जाऊ नये; असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अग्रवाल, उपविभागीय अभियंता हेमंत पाटील, शाखा अभियंता एस.आर.पाटील यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्वेच्छेने वेश्याव्यवसाय गुन्हा नाही; सुप्रीम कोर्टाने कायद्यावरच बोट ठेवलं

Maharashtra News Live Update: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शिर्डीत दाखल

Raigad Fort: रायगडाचा महादरवाजा शत्रूला लांबून कधीच दिसू नये असा का बांधला होता?

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

SCROLL FOR NEXT