Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: आई गायीला पाणी पाजण्यासाठी गेली; तिकडून आल्‍यावर मुलीला पाहून आक्रोश

आई गायीला पाणी पाजण्यासाठी गेली; तिकडून आल्‍यावर मुलीला पाहून आक्रोश

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील ईश्वर कॉलनीतील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी उघडकीला आली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस (POlice) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

जळगावातील (Jalgaon) ईश्वर कॉलनीत वास्‍तव्‍यास असलेली साक्षी दिनेश प्रजापत (वय १६) असे मृत तरूणीचे नाव आहे. साक्षी प्रजापत ही परिवारासह वास्तव्याला होती. वडील धान्य मार्केट दुकानात दलालीचे काम करून उदरनिर्वाह करतात. गुरूवारी (१२ जानेवारी) सकाळी वडील कामाला निघून गेले. साक्षी ही आईसोबत घरी होती.

आत्‍महत्‍येचे कारण अस्‍पष्‍ट

दुपारी आई गायीला पाणी पाजण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. तेवढ्यात साक्षीने घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण नेमके कळू शकले नाही. साक्षीची आई घरात आल्यानंतर मुलीने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलीला पाहताच एकच हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या मदतीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT