Girish Mahajan Sanjay Raut Saam tv
महाराष्ट्र

Girish Mahajan: स्‍वच्‍छ आहात तर घाबरायची गरज नाही; गिरीश महाजनांचा संजय राऊतांना टोला

स्‍वच्‍छ अहात तर घाबरायची गरज नाही; गिरीश महाजनांचा संजय राऊतांना टोला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : ईडीची कारवाई सुरू झाल्‍यानंतर संजय राऊत हे ट्विट करून सांगता आहेत, की आपण किती शुद्ध आहोत. तुम्‍ही जर स्‍वच्‍छ असाल तर कोणीही तुमचे काही करू शकणार नाही. यामुळे घाबरायची गरज नाही; असा टोला माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. (Jalgaon News Girish Mahajan Statement Sanjay Raut)

शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांच्‍या घरी जावून ईडीची (ED) चौकशी सकाळी साडेसात वाजेपासून सुरू आहे. या चौकशीबाबत बोलताना आमदार महाजन यांनी प्रतिक्रीया दिली आहे. यात ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीकडून कारवाई होणे ही रूटीन बाब आहे. त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरूच होती; पण वारंवार चौकशीला बोलावून देखील ते टाळाटाळ करत होते. म्हणून आता ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी गेले आहेत.

बाळासाहेबांची शपथ घ्यायची गरज नाही

ईडीची चौकशी सुरू असताना संजय राऊत हे आता ट्विट करून आपण शुद्ध आहोत; असे सांगताहेत. बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत आहेत. पण चौकशीच्या वेळी शपथ घ्यायची गरजच नाही. त्यांचे जर काही व्यवहार झालेले नसतील तर घाबरायची गरज नाही; असा टोलाही गिरीश महाजन यांनी राऊतांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshi Puranpoli Recipe : खानदेशी पुरणपोळी 'मांडे', बैलपोळ्यासाठी खास गोड पदार्थ

Sprouts Curry : पावसाळ्यात भाजी कोणती करावी सुचत नाही? बनवा मिक्स कडधान्याची उसळ

Maharashtra Rain Live News : कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ राहाता येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

Accident : तिचा हात १०-१२ फुटांवर पडला, सरकत-सरकत...; अभिनेत्रीच्या अपघाताची घटना मन सुन्न करणारी

Chief Minister Fadnavis: सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT