Girish mahajan 
महाराष्ट्र

सत्‍ताधारी कठीण काळजाचे; माजी मंत्री गिरीश महाजन यांचा टोला

सत्‍ताधारी कठीण काळजाचे; माजी मंत्री गिरीश महाजन यांचा टोला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सत्ताधाऱ्यांनी पूरग्रस्त भागातील पाहणी दौरे केले; मात्र कोणतीही मदत अद्याप दिली नाही. सत्‍ताधारी कठीण काळजाचे असल्‍यानेच पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसल्‍याचे दुर्दैव आहे; अशी टीका राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली. (jalgaon-news-girish-mahajan-statement-Authorities-visited-the-site-and-wiped-out-the-flood-victims)

जळगाव मराठी पत्रकार संघातर्फे पूरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली; दत घेवून जाणाऱ्या वाहनास गिरीश महाजन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण सपकाळे आदी उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले,की कोकण भागातील पूरग्रस्तानची स्थिती अत्यंत भयानक आहे. आपण त्या ठिकाणी चार दिवस होतो. लोकांचे सर्वच वाहून गेले आहे. त्यांचे अंगावरचे कपडे तेवढे शिल्लक आहेत. त्यांना तातडीची मदत करण्याची गरज आहे. सामाजिक संस्था, आमच्या पक्षातर्फे मदत सुरू झाली आहे. मात्र शासनाची मदत अद्यापही मिळाली नाही.

यंत्रणा गतिमान करण्याची गरज

राज्यातील सत्ताधारी अत्यंत कठीण काळजाचे आहेत. त्‍यांनी पाहणी केली मात्र कोणतीही मदत न करता तोंडाला पाने पुसली आहेत. शासनाने पंचनामे करण्याची वाट न पाहता तातडीने पूरग्रस्तांना मदत करण्याची गरज आहे. शिवाय त्या ठिकाणी प्रशासन यंत्रणा गतिमान करण्याची गरज आहे. प्रशासन पातळीवर सर्व दिरंगाई सुरू आहे. आम्ही त्या ठिकाणी जावून मदत केली, मात्र त्या वेळी कोणतीही शासकीय यंत्रणा पोहचली नव्हती. शासनाचा अत्यंत ढिसाळ कारभार सुरू आहे. आजपर्यंत आपण असे शासन कधीच पाहिले नव्हते; असा टोलाही महाजन यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: सून छोटे कपडे घालून रिल्स बनवायची; सासू सासरे कंटाळले, निराशेतून धक्कादायक पाऊल उचलले

Maharashtra Politics: मोठी बातमी! सुनील तटकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय घडामोडींना वेग

CBI चे पथक नाशिकमध्ये दाखल, थेट दिल्लीतून घडामोडींना वेग; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल

Ladki Bahin Yojana: ६६ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, सरकारचा १० हजार कोटींचा भार कमी, महत्वाची अपडेट वाचा

SCROLL FOR NEXT