Jalgaon Ganesh Festival Saam tv
महाराष्ट्र

Ganesh Festival: दोन वर्षानंतर घुमला ढोल– ताशांचा गजर; लाडक्‍या बाप्‍पाचे स्‍वागत

दोन वर्षानंतर घुमला ढोल– ताशांचा गजर; लाडक्‍या बाप्‍पाचे स्‍वागत

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : गणपती बाप्पा मोरया..च्या गजरात आज शहरासह जिल्ह्यात श्री गणेशाचे (Ganesh Festival) स्वागत केले जात आहे. घरगुतीसह सार्वजनिक गणेश मंडळात आज श्रींच्या मुर्तीची स्थापना केली जात असून दोन वर्षानंतर कोणतेही निर्बंध नसल्याने तरुणाईसह सर्वांमध्‍येच उत्साह आहे. तेवढाच उत्साह (Jalgaon) शाळकरी मुलांमध्‍ये देखील पाहायला मिळत आहे. दोन वर्ष ढोल ताशांविना बाप्‍पाची मिरवणूक काढून स्थापना केली जात होती. यंदा मात्र सवाद्य मिरवणूक काढून जल्‍लोषात स्‍वागत झाले. (Jalgaon News Ganesh Festival)

दोन वर्षांपासून बाप्पाच्या सणावर (Corona) कोरोनाचे सावट असल्याने गणेश भक्तांमध्‍ये निराशेचे वातावरण होते. यंदा मात्र कोणतेही निर्बंध नसल्याने तरुणाईमध्‍ये जेवढा उत्साह आहे तेवढाच उत्साह शाळकरी मुलांमध्‍ये सुधा पाहायला मिळत आहे. जळगावमध्‍ये आर. आर. विद्यालयातील मुले आणि मुली बाप्पाच्‍या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी ढोल ताशे आणि लेझिम खेळाची आकर्षक प्रात्यक्षिके ही लक्षवेधी ठरली आहेत.

ढोल ताशांच्या गजरात तसेच लेझीम खेळून विद्यार्थ्यांनी बापाचा जल्लोष स्वागत केल. शाळेच्या वतीने शहरातून बाप्पाच्या आगमनाची भव्य अशी मिरवणूक काढून त्याची स्थापना करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

SCROLL FOR NEXT