Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : नर्सरीच्या रोपांसाठी घेतली रक्कम; माल न पुरविता २५ लाख रूपये लाटले

नर्सरीच्या रोपांसाठी घेतली रक्कम; माल न पुरविता २५ लाख रूपये लाटले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : नर्सरी उद्योगासाठी लागणाऱ्या झाडांचे रोप पुरविण्याच्या नावाखाली वेळोवेळी रक्कम बँक खात्याद्वारे घेऊन कर्नाटकच्या भामट्याने (Jalgaon) जळगावच्या प्रौढाला तब्बल २५ लाखांचा चुना लावला. याबाबत विद्युत कॉलनीतील रहिवासी दीपक बळिराम चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर (Police) पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (Tajya Batmya)

दीपक चौधरी चार वर्षांपासून गार्डन डेव्हलपिंगच्या व्यवसायात आहे. बऱ्यापैकी शास्त्रीय माहिती आणि ग्राहकांची मागणी असलेले दुर्मिळ, उपयोगी रोपांचा ते पुरवठा करतात. त्यांच्याकडे सागवान झाडाच्या रोपांची मोठी ऑडर होती. व्यवसायानिमित्त त्यांनी कर्नाटकसह इतर राज्यांतूनही रोपे यापूर्वी मागवली आहेत. काही महिन्यांपूर्वी कर्नाटक दौऱ्यात आणलेला माल हातोहात त्यांनी विक्री केला. वारंवार केवळ मालखरेदीसाठी कर्नाटकात जाण्याऐवजी तेथील रोप विक्रेत्यांच्या संपर्कात येऊन ओळखही झाली होती.

५ जानेवारी २०२२ ला कर्नाटकातील (Karnataka) शंकर गवळा (रा. चित्रदुर्ग) यांच्याशी संपर्क साधला व आपली ऑर्डर त्यांना कळविली. त्यापोटी शंकर गवळा याच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये रोख टाकून सागवान झाडांच्या रोपांची बुकिंग फायनल केली. दीपक चौधरी यांनी शंकर गवळा याला १५ लाख रुपयांची रोपे बुक केल्यावर ते निश्‍चिंत होते. मात्र, आठ दिवस उलटूनही माल येत नाही, म्हणून त्यांनी चित्रदुर्ग (कर्नाटक) येथे संबंधितांना फोन केला. त्या वेळी तिकडून आणखी पैशांची मागणी करण्यात (Fraud) आल्यावर चौधरी यांनी पुन्हा आठ लाख ५० हजार रुपये सागवानचे व इतर झाडे घेण्यासाठी बोलविले.

त्यासाठी त्यांनी एक लाख ५० हजार रुपयांचे झाडे विकत घेतली. त्यानंतर झाडे लागणार असल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून मागणी सांगितली. त्या वेळी त्या व्यक्तीने बँक खात्यावर १५ लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ही रक्कम १९ जानेवारी २०२२ ला पाठविली. आठ दिवसांनंतरही झाडे आली नाहीत. त्यामुळे पुन्हा विचारणा केली असता, त्याने पूर्ण पैसे देण्याचे सांगितले. त्यानुसार पुन्हा आठ लाख पाच हजार रुपये दिले. असे (१९ जानेवारीपासून आजपर्यंत) एकूण २५ लाख रुपयांची लुबाडणूक केल्याचे आढळून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT