महाराष्ट्र

महामार्गावर फलक सरकारचे; मालकी मात्र आमदारांची

महामार्गावर फलक सरकारचे; मालकी मात्र आमदारांची

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : खांब असो, दिशादर्शक असो प्रत्येक सरकारी वस्तूवर आपलाच अधिकार गाजवत स्वतःचे बॅनर लावणे चालूच आहे. राजकिय नेते, पुढारी असो की अगदी गल्‍लीतील कार्यकर्ता..उठसुठ कोणीही उठतो आणि बॅनर लावण्याचे जणू काही फॅडच लागले आहे. यातच जळगाव ते मुक्‍ताईनगर दरम्‍यान चौपदरीकरण झालेल्‍या महामार्गावर दिशादर्शक फलकच झाकून आमदारांच्‍या वाढदिवसाचे बॅनर झळकताय.

तरसोद ते चिखली दरम्‍यान महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्‍या सुरू आहे. या रस्‍त्‍याचे काम जळगावपासून भुसावळच्‍यापुढे पुर्ण होत आले आहे. नवीन चौपदरीकरण झालेल्‍या महामार्गावर दिशा तसेच किलोमीटर दर्शविण्यासाठी महामार्ग प्राधिकरणने मोठे फलक लावले आहेत. परंतु हेच फलक झाकून वाढदिवसाचे फ्लेक्‍स लावण्याचे काम करण्यात आले आहे.

संपुर्ण बोर्डच झाकला

महामार्ग प्राधिकरणतर्फे चौपदरीकरणाचे काम पुर्ण झाल्‍यानंतर सर्व रस्‍त्‍यावर हिरव्‍या रंगातील फलक लावले आहेत. यात काही ठिकाणी रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूंनी लोखंडी ॲंगलच्‍या सहाय्याने मोठ्या अक्षरात शहरांची नावे व त्‍यांचे अंतर दर्शविणारे फलक लावले आहे. मात्र, हा मोठा फलक जणू काही आपल्‍याच मालकीचा असल्‍याचे मानत संपुर्ण फलकावर मुक्‍ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्‍या वाढदिवसाचे फ्लेक्‍स लावण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Navale Bridge: एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावणार ; नवले पूल अपघातनंतर सगळ्याच यंत्रणा एकवटल्या

Narendra Modi : बिहारमध्ये कोणता फॉर्म्युला यशस्वी ठरला? PM नरेंद्र मोदींनी सगळंच सांगितलं

Maharashtra Live News Update: पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बिबट्याचा प्रश्न आपत्ती म्हणून माझ्याकडे सोपवा; गिरीश महाजणांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी|VIDEO

Saturday Horoscope: नोकरी व्यवसायात मिळेल यशच यश, रखडलेली कामे पूर्ण होणार, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT