Girish Mahajan Nawab Malik 
महाराष्ट्र

नवाब मलिकांची मनस्थिती ठिक नाही, त्‍यांना लवंगी फटाके फोडू द्या : गिरीश महाजन

नवाब मलिकांची मनस्थिती ठिक नाही, त्‍यांना लवंगी फटाके फोडू द्या : गिरीश महाजन

संजय महाजन

जळगाव : गेल्‍या काही दिवसांपासून राष्‍ट्रवादीचे नेते नबाब मलिक भाजप नेत्यावर विविध गंभीर स्वरूपाचे आरोप करीत आहेत. याला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी म्हटले, की नबाब मलिक करीत असलेले बेछूट व बिनबुडाचे आरोप पाहता त्यांची सध्या मनस्थिती ठीक नाही असे वाटत आहे. (jalgaon-news-Former-Minister-Girish-Mahajan-targets-Nawab-Malik)

जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानापासून शिवाजी महाराजनच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या मोरच्यां चा शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी स्वतः ट्रॅक्टर चालवीत गिरीश महाजन यांनी मोर्चामध्ये सहभाग नोंदविला. या मोर्चादरम्‍यान महाजन यांनी मिडीयाशी संवाद साधताना मलिक यांच्‍यावर निशाणा साधला.

राज्यात एवढे प्रश्न असतांना त्याकडे लक्ष न देता मलिक हे बेछूट आरोप करीत आहेत. त्यांना सध्या लवंगी फटाके फोडू द्या, येत्या काळात त्यांना कळेल देवेंद्र फडणवीस कोणता बॉम्ब फोडणार आहेत. ते तेव्हा कळेल ते कुठे आहेत आणि काय बरळत आहेत.

पालकमंत्री पाटील यांच्‍यावरही निशाणा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्‍यावर निशाणा साधताना महाजन म्‍हणाले, की गुलाबराव पाटील यांनी देखील सांगावे की त्‍यांनी कोणत्या शेतकऱ्यांना मदत केली. मदत न करता भाजपवर त्यांनी टीका करू नये; असंही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT