Jalgaon Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Heavy Rain : मुक्ताईनगर, रावेर तालुक्यात पूरस्थिती; पूल वाहून गेला; सुकी नदीपात्रात युवक बेपत्ता

मुक्ताईनगर, रावेर तालुक्यात पूरस्थिती; पूल वाहून गेला; सुकी नदीपात्रात युवक बेपत्ता

साम टिव्ही ब्युरो

मुक्ताईनगर (जळगाव) : मुक्ताईनगर व रावेर तालुक्यांत संततधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळित झाले आहे. मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यात जोंधनखेडा येथे सातपुड्याच्या पायथ्याशी गोरक्षगंगा नदीवर असलेले कुंड धरण ओव्हरफ्लो होऊन सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. तर रावेर (Raver) तालुक्यातील बोकड नदीवरील पूल वाहून गेला असून, सुकी नदीपात्रात युवक बेपत्ता झाला आहे. (Breaking Marathi News)

मुक्ताईनगर तालुक्यातील गोरक्षगंगा नदीला पूर आला असून, नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी काठावरील गावांना प्रशासनाने (heavy Rain) सतर्कतेचा इशारा दिला आहे. कुऱ्हा येथे पूरस्थिती निर्माण झाली असून, पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठ आणि गावाचा संपर्क तुटला आहे.

नदीवरील पूल वाहून गेला
रावेर शहरासह तालुक्यात शनिवारी सकाळपासून दुपारी चारपर्यंत कधी मध्यम ते कधी रिपरिप पाऊस सुरू होता. मध्य प्रदेशात सातपुड्याच्या अंतर्गत भागात ढगफुटी झाल्याने तालुक्यातील नागोरी, भोकरी, मात्राण आणि सुकी नदीला देखील पूर आला. तालुक्यातील अभोडा आणि जिन्सी या दोन गावांना जोडणारा आणि रावेरहून मोरव्हालमार्गे पालकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल बोकड नदीला आलेल्या जोरदार पुरामुळे वाहून गेल्याचे वृत्त आहे. पुरामुळे अहिरवाडी - रावेर दरम्यानचाही संपर्क तुटला असून अहिरवाडी व निरुळ येथील पाच ते सहा घरातील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

युवक बेपत्ता
रावेर तालुक्यातील रोझोदा येथील युवक रवींद्र दगडू चौधरी ऊर्फ महेंद्र कोळी (वय ३३) हा सुकी नदीवर असलेल्या गारबर्डी मध्यम प्रकल्पजवळ नदीपात्रात बेपत्ता झाल्याची माहिती तहसीलदार बी. ए. कापसे यांनी दिली. शुक्रवारी (ता. २१) दुपारी बेपत्ता झालेला हा युवक आज दुपारपर्यंत सापडला नव्हता. तालुक्यात आलेल्या एसडीआरएफच्या तुकडीने आज सकाळी नदी पात्रात त्याचा कसून शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही. त्याच्या ८ मित्रांसह सुकी नदीवरील गारबर्डी मध्यम प्रकल्पावर फिरायला गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : ईईssssss....आईस्क्रीममध्ये आढळली सापाच्या पिल्लाएवढी कीड, खाण्याआधी दहा वेळा विचार करा!

Moti Mangalsutra Designs: वटपौर्णिमेला खास लूक हवा? मोती मंगळसूत्राच्या या 7 ट्रेंडी सुंदर डिझाइन्स नक्की पाहा

Maharashtra News Live Update: परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

Chanakya Niti: ही ५ ठिकाणं, तिथं कंजूषपणे वागा; कधीच होणार नाही पाकीट रिकामं, बँक बॅलन्स तर कडकच!

SCROLL FOR NEXT