हद्दपार 
महाराष्ट्र

भुसावळात नगरसेवकासह पाच जण हद्दपार; टोळी गँगविरुध्द मोठी कारवाई

भुसावळात नगरसेवकासह पाच जण हद्दपार; टोळी गँगविरुध्द मोठी कारवाई

साम टिव्ही ब्युरो

भुसावळ : शहरातील पोलिस ठाण्यातंर्गत खूनाचा प्रयत्न, दरोडा, अनेक गंभीर गुन्हे दाखल असणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी भुसावळातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. गंभीर गुन्हे टोळीने करणाऱ्या एकूण पाच गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. (jalgaon-news-Five-people-including-a-corporator-were-deported-in-Bhusawal)

काही वर्षांपासून भुसावळ शहर गुन्हेगारीचे केंद्र बनू पाहत आहे. खून, दरोडे, हाणामाऱ्या अशा घटना वारंवार घडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली असून, गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. येथील नगरसेवक राजकुमार खरात यांसह त्यांचे चार भाऊ व चिन्या अशा पाच जणांच्या टोळीला जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी हद्दपारीचे आदेश बुधवारी (ता. ११) काढले. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षकांकडे पाठविल्यावर अधीक्षक मुंढे यांनी पाचही जणांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश काढले.

पाचही जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे

पिस्तूल वापरणे, हत्यारे वापरणे, खूनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, साहित्यासह, दरोड्याची तयारी, गैरकायदा मंडळी जमवून शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देऊन दुखापत करणे, नुकसान करणे यासारखे गुन्हे करून दहशत निर्माण करणे, शहर पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या खरात बंधूसह अमोल ऊर्फ चिन्ना श्‍याम खिल्लारे या पाचही जणांना पोलिस अधीक्षकांनी दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

या पाचही जणांना बजावले आदेश

जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे दाखल झालेल्या प्रस्तावाची शहानिशा चौकशी करून गोपनीय जबाब नोंद करून अधीक्षक मुंढे यांनी टोळी प्रमुख आतिष रवींद्र खरात (वय २५, रा. समतानगर, भुसावळ), टोळी सदस्य नगरसेवक राजकुमार ऊर्फ सनी रवींद्र खरात (२७, रा. समतानगर, भुसावळ), हंसराज रवींद्र खरात (१९, समतानगर, भुसावळ), राजन ऊर्फ गोलू रवींद्र खरात (२२, रा. समतानगर, भुसावळ) आणि अमोल ऊर्फ चिन्ना खिल्लारे (२५, रा. न्यू वॉटर टॅक, हनुमान मंदिराजवळ, भुसावळ) यांचा हद्दपारीत समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठवे वेतन आयोग आणि जुन्या पेन्शनबाबत महत्वाची अपडेट समोर

Skin Care: उन्हामुळे चेहऱ्याचा ग्लो जाणून पिंपल्स आणि डलनेस वाढलाय? मग या घरगुती फेसमास्कमुळे प्रॉब्लेम्स होतील दूर

Pune Crime: पुणे हादरले! हॉटेलमध्ये तरुणावर कोयत्याने सपासप वार, थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

SCROLL FOR NEXT