Muktainagar Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Muktainagar Vidhan Sabha : धक्कादायक..प्रचार रॅलीदरम्यान अपक्ष उमेदवारावर गोळीबार; मुक्ताईनगर मतदारसंघातील घटना

Jalgaon News : विधानसभा निवडणुकीत अर्ज माघारी झाल्यानंतर बहुतांश उमेदवारांनी आज प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यानुसार मतदारसंघात प्रचार करण्यास सुरवात केली आहे.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

मुक्ताईनगर (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात चुरशीची लढाई पाहण्यास मिळणार आहे. मात्र मतदारसंघात प्रचाराला सुरवात झाल्यानंतर खळबळजनक घटना घडली असून मुक्ताईनगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या प्रचार रॅली दरम्यान गोळीबार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

विधानसभा निवडणुकीत अर्ज माघारी झाल्यानंतर बहुतांश उमेदवारांनी आज प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यानुसार मतदारसंघात प्रचार करण्यास सुरवात केली आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील (Muktainagar) मुक्ताईनगर विधानसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेले आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार असलेले विनोद सोनवणे हे आज बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारुती येथे प्रचाराचा शुभारंभ करून ते तालुक्यातील राजुरा येथे प्रचारासाठी निघाले असता त्यांच्या ताफ्यावर अज्ञात इसमांनी (Crime News) गोळीबार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

प्रचाराचा आजपासून शुभारंभ झाला असताना अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे हे बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारुती येथे प्रचाराचा शुभारंभ करून ते तालुक्यातील राजुरा येथे प्रचार रॅलीसाठी निघाले होते. प्रचार रॅली जात असताना अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून येत त्यांनी गोळीबार केला. सुदैवाने त्यांच्या गाडीवरून गोळ्या निघून गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणी पोलिसांकडून आता तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

मोठी बातमी! टर्म संपण्याआधीच राष्ट्रपती राजीनामा देणार? भारताशेजारील देशात काहीतरी घडतंय

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

Farmer Loan Waiver Scheme: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ

SCROLL FOR NEXT