Jalgaon Creative News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: मुलाचा हट्ट अन्‌ बापाने चक्‍क दुचाकीपासून बनविली स्टायलिस्ट कार

मुलाचा हट्ट अन्‌ बापाने चक्‍क दुचाकीपासून बनविली स्टायलिस्ट कार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा बाप. मग श्रीमंत व्‍यक्‍तीप्रमाणे घरासमोर कार (Car) लावणे दुरचीच गोष्‍ट. यातच मुलाचा हट्ट पप्‍पा आपणही कार घेवूया. मुलाचा हट्ट पुरवता येईल; इतका पैसा नाही. मग काय त्‍या बापाने शक्‍कल लढविली अन्‌ मुलाचा हट्ट पुरविण्यासाठी चक्‍क दुचाकीपासून अगदी कंपनीने बनविलेल्‍या (Jalgaon) कारप्रमाणेच स्‍टायलिश कार बनविण्याची कमाल केली. (Jalgaon Today News)

ज्ञानेश्वर गोटूराम जोशी असे त्या कार बनविणाऱ्या बापाचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यातील वाकोद (ता. जामनेर) येथील ते रहिवासी. शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे शिक्षणही जेमतेम पाचवीपर्यंत झाले आहे. कोणत्याही प्रकारचे टेक्निकल ज्ञान नसतांना त्यांनी आपली कला व शक्‍कल लावून कंपनीने बनविलेल्‍या कारसारखीच कार ती देखील दुचाकीच्‍या इंजिनपासून साकारत मुलाला बनवून दिली. ही कार सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

थार कार पाहून मुलाचा हट्ट

ज्ञानेश्‍वर जोशी यांचा मुलगा आर्यन याने शाळेत जात असताना थार कार बघितली. यानंतर त्याने वडिलांकडे तशीच नवीन कारसाठी हट्ट धरला. परंतु, शेतमजूरी करत असलेल्‍या बापाला ते शक्‍य नव्‍हते. परंतु मुलाचा हट्ट कायम होता. अखेर जोशी यांनी दुचाकीपासून अगदी हुबेहूब कार बनवली. ज्ञानेश्वर जोशींनी बनवलेली कार स्टायलिस्ट बनविली असून फीचर्स देखील खास आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath : अंबरनाथमध्ये तरुणावर हल्ला, पुतणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून काकाने काढला राग; ५ आरोपींवर गुन्हा

Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत

संजय दिना पाटील यांची पत्रकारांना शिवीगाळ; मुख्यमंत्री काय म्हणाले? VIDEO

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन

यंदा वटपौर्णिमेला नेसा पैठणी साड्या, हे आहेत लेटेस्ट 5 पॅटर्न

SCROLL FOR NEXT