marriage 
महाराष्ट्र

बापाचे छत्र हरपले..पण लग्‍न मंडपात मृत वडीलांचा पुतळा उभारून आशीर्वाद

बापाचे छत्र हरपले..पण लग्‍न मंडपात मृत वडीलांचा पुतळा उभारून आशीर्वाद

Rajesh Sonwane

जळगाव : बाप लेकीचं नातं शब्दात बाधने सोपे नाही. बाप हा बाप असतो त्याच्याविना सारं जग सुन असते. बाबांशिवाय अस्तित्वचे नसते; याची प्रचिती नांद्रा (ता. पाचोरा) येथे झालेल्‍या एका विवाहसोहळ्यात पहायला मिळाले. बापाचे छत्र हरपले; परंतु, त्‍यांचा आशिर्वाद घेण्यासाठी बापाचा पुतळा उभारला व त्‍यांच्‍यासमोर कन्‍यादान झाले. (jalgaon-news-Father-death-corona-but-a-blessing-by-erecting-a-statue-of-father-in-the-wedding-tent)

नांद्रा (ता. पाचोरा) येथील सेवानिवृत्त जवान भागवत पाटील यांचे कोरोनात निधन झाले. यातच त्यांची तिसरी मुलगी प्रियंका हिचा विवाह (marriage) ठरला. वडील छत्र हरपले परंतु, त्‍यांचे अस्तित्‍व लग्नात असायला हवे, ही प्रबळ भावना तिच्या मनात होती. यामुळे तिने असे पाऊल उचलले की अवघे जग स्तिमीत झाले. एका लेकीचे बापावर, आणि दिवंगत बापाचे आपल्या कुटुंबावर इतके काही प्रेम असू शकते याची आपण कल्पना देखील करणार नाही. याचा उत्‍तम उदाहरण नांद्रा येथील विवाह सोहळ्यात पहायला मिळाले.

त्‍यांचे अस्तित्व कायम ‍सोबत

नांद्रा (ता. पाचोरा) या गावातील माजी सैनिक भागवत पाटील यांना चार कन्या होते. चारही मुलींचे योग्य ठिकाणी लग्न लावून दिले की मी जबाबदारीतून मोकळा; असे ते मुलींना नेहमी सांगत. दोन मुलींचे लग्न मनासारखे झाले होते. त्‍यानुसारच तिसरी लेक प्रियांकाच्या लग्न देखील करायचे. त्‍या अनुषंगाने तयारी देखील सुरु होती. परंतु, कुटूंबावर आघात झाला आणि भागवत पाटील यांचे कोरोनात निधन झाले. चारही मुलींचे लग्न लावण्यापूर्वी वडीलांना जग सोडून जावे लागले. पण ते आमच्या कुटूंबासोबत आजही आहेत; या भावनेतून त्यांची स्मृती कायम सोबत राहावी या उद्देश्यातून त्यांचा पुतळा बनवून विवाहप्रसंगी वधूसह सर्व मुलींनी आशीर्वाद घेतले.

पप्‍पा म्हणत डोळे पाणावले

पाचोरा येथे प्रियंका यांचा विवाह राहुल पाटील यांच्याशी नुकताच झाला. आपल्‍या मृत वडिलांच्‍या स्मृती जिवंत ठेवण्याच्या अनुषंगाने वडीलांचा पुतळा लग्न मंडपात आणला. त्‍यावेळी चार मुलींचे डोळे पाणावले. वधूसह चारही मुलींनी लग्नाच्‍या स्‍टेजवर वडिलांचा आशीर्वाद घेतला. वधू प्रियंकाच्या भावंना पाहून उपस्थित वऱ्हाडींचेही डोळे पाणावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT