Jalgaon News Girna River Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon News : नदीपात्रातील खड्ड्याने घेतला शेतकऱ्याचा जीव

नदीपात्रातील खड्ड्याने घेतला शेतकऱ्याचा जीव

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : आव्हाणे (ता. जळगाव) येथील शेतकरी शेतात जाताना नदीतील मोठ्या खड्डयाचा अंदाज न आल्याने तोल जावून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आव्हाणे परिसरात गिरणा (GIrna River) नदीत घडली. वाळू माफीयांनी मोठ मोठे खड्डे करून वाळू नेली आहे. शेताकडे जाताना नदी किनारी असलेल्या याच खड्ड्यात शेतकऱ्यांचा (Farmer) पाय घसरल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. (Breaking Marathi News)

आव्हाणे (ता. जळगाव) येथील शेतकरी मधुकर बाबुराव ढोले (वय ६५) हे नेहमीप्रमाणे सकाळी साडेदहाच्या सुमारास शेतात जात होते. याचवेळी गिरणा नदी शेजारून जात असताना पाय घसरून पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घडली आहे. ते पाण्यात पडल्यानंतर नदीच्या काठावर असलेल्या काही पट्टीतील पोहणाऱ्या तरूणांनी नदीत उडी घेवून त्यांना बाहेर काढले.

रुग्णालयात पोहचण्यापुर्वीच मृत्‍यू

खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत असतांना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली होती. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास हवाल ईश्वर लोखंडे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्राच्या अर्जाची माहिती आता थेट SMSवर

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधव उतरले रस्त्यावर

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गानं लाज आणली, उदघटानाला जाण्यास गडकरींचा नकार

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! बड्या ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुठे कोणाची नियुक्ती? वाचा

Shivali Parab: शिवाली परबचा नवा ग्लॅमरस लूक; सिल्व्हर बॅकलेस गाऊनमध्ये कल्याणच्या चुलबुलीचा जलवा

SCROLL FOR NEXT