Suicide case 
महाराष्ट्र

आठ महिन्यांनी सापडली ‘सुसाइड नोट’ अन्‌ उलगडले आत्महत्येचे गूढ

आठ महिन्यांनी सापडली ‘सुसाइड नोट’ अन्‌ उलगडले आत्महत्येचे गूढ

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : धानवड (ता. जळगाव) शिवारात शेतजमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकरी सुकलाल घोडके (वय ५१) यांनी १९ जानेवारी २०२१ ला गळफास घेत आत्महत्या केली होती. तब्बल आठ महिन्यांनंतर मृत शेतकऱ्याने लिहून ठेवलेली ‘सुसाइड नोट’ सापडली आहे. यानंतर पीडित कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. चिठ्ठीची खातरजमा करून एमआयडीसी पोलिसांत शेत विकायला भाग पाडणारा दलाल आणि सावकार अशा दोघांवर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. (jalgaon-news-farmer-suicide-case-after-eight-month-suicide-note)

पीडित शेतकऱ्याची पत्नी शोभा घोडके (वय ४२) यांच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, त्यांचे पती सुकलाल घोडके यांनी १९ जानेवारीला गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर शोभा घोडके यांनाही खासगी नोकरी करावी लागली. तर, मुलगा हर्षल मिळेल ते काम करुरून कुटुंबीयांना मदत करतो.

सफाई करताना मिळाली चिठ्ठी

पतीचा मृत्यू होऊन आठ महिने लोटले असताना अचानक सुटीच्या दिवशी शोभा घोडके घराची झाडपूस आणि साफसफाई करत असताना पतीच्या कपाटातील जुने कपडे काढत असताना आधारकार्डसह काही चिटोऱ्या, बिल मिळून आले. त्यात वहीच्या पानावर लाल पेनाने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. बऱ्याच दिवसांपासून घडी केलेली ही चिठ्ठी कागदांच्या चिटोऱ्यात अडगळीत कुजत पडल्याने तिचा एक तुकडा कुठेतरी हरवला.

अन्‌ त्‍यांच्‍या पायाखालची जमीन सरकली

अर्धा फाटलेल्या या चिठ्ठीतील ‘मायना’ वाचल्यावर घोडके कुटुंबीयांच्या पायाखालची वाळूच सरकली. ताणतणावातून पतीने आत्महत्या केल्याचा समज झाला असताना या चिठ्ठीतील मजुकराने पती सुकलाल यांच्या मृत्यूचे काळे सत्य समोर आणले. चिठ्ठी घेऊन शोभा घोडके मुलगा हर्षलसह पोलिस ठाण्यात गेल्या. पोलिसांनी गांभीर्य ओळखत या प्रकरणी शेत विक्रीचा सौदा करणारा दलाल प्रकाश माळी व न दिलेल्या दोन लाखांवर व्याज आकारणारा सावकार शैलेंद्र वसंत चिरमाडे यांच्याविरुद्ध आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: "स्वतःच्या अंगाशी आलं की ते राजकारण"; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

SCROLL FOR NEXT