Shiv sena 
महाराष्ट्र

एरंडोलमध्‍ये शिवसेनेतर्फे रास्‍तारोको; महागाई व भाजप आमदारांच्‍या कृतीचा निषेध

एरंडोलमध्‍ये शिवसेनेतर्फे रास्‍तारोको; महागाई व भाजप आमदारांच्‍या कृतीचा निषेध

संजय महाजन

जळगाव : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या आमदारांच्या कृतीचा निषेध नोंदवण्यासाठी एरंडोल येथे शिवसेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. (jalgaon-news-erandol-shiv-sena-road-block-aandolan)

एरंडोल पंचायत समितीच्या कार्यालयापासून महामार्गापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शिवसैनिकांनी महार्गावर ठिय्या मांडत भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपची भूमिका मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे. हेच भाजप आमदारांच्या विधानसभेतील भूमिकेवरून स्पष्ट झाले आहे, असा आरोप यावेळी बोलताना डॉ. हर्षल माने यांनी केला.

वाढत्‍या महामार्गविरोधातही आवाज

वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे आवाक्याबाहेर गेलेले दर या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महागाई नियंत्रणात आणावी, अशी मागणी करण्यात आली. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महानंदा पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : सुवर्ण बाजारात अचानक खळबळ! सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले; १० दिवसांत अशा बदलल्या किमती

Pregnancy diet: गर्भवती महिलांसाठी श्रावणातील आहार ठरतोय महत्त्वाचा; मांसाहार टाळताना प्रोटीनची कमतरता होऊ नये म्हणून काय खावं?

Maharashtra News Live Update : रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून सांगोल्यात दांडक्याने मारहाण

Shocking : नागपूर हादरले! १६ वर्षीय मुलीला धमकावले, ओलीस ठेवून वारंवार लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाला अटक

Maharashtra government : तुकाराम मुंढेंनी मांडला संपूर्ण प्लॅन अन् शिंदेंनी क्षणात दिला आदेश! FDA च्या बैठकीतील 'तो' मोठा निर्णय आला समोर

SCROLL FOR NEXT