Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

झोक्‍यात तीनही बहिणी खेळत होत्‍या अन्‌ क्षणार्धात होत्‍याचे नव्‍हते झाले

झोक्‍यात तीनही बहिणी खेळत होत्‍या अन्‌ क्षणार्धात होत्‍याचे नव्‍हते झाले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : घराच्या छतावरील पाईपाला बांधलेल्या साडीच्या झोक्यात तिन्‍ही बहिणी खेळत होत्या. खेळता खेळता अचानक झोका तुटला. यात एकीचा जागीच मृत्यू (Death) झाला असून दोन जण जखमी झाल्या आहेत. अचर्ना धनसिंग पावरा (वय– दीड वर्ष) असे मयत बालिकेचे नाव आहे. (jalgaon news erandol death of a little girl due to a broken sari)

एरंडोल (Erandol) तालुक्यातील सावदे प्र.चा. येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली. सावदे प्र.चा. येथे धनसिंग शीला पावरा हे कुटूंबासह वास्तव्यास असून गेल्‍या अनेक वर्षांपासून ते गावातील शेतकऱ्यांची शेती बटाईने करुन परिवाराचा (Jalgaon News) उदरनिर्वाह करतात. दरम्‍यान शनिवारी (१८ जून) सकाळी धनसिंग व त्याची पत्नी शेतात गेले होते. तर धनसिंग यांची आई व त्याच्या तीन मुली घरी होत्या. कच्च्या विटांच्या घरावर लोखंडी पाईपाला साडीचा झोका बांधला होता.

अन्‍य दोन्‍ही गंभीर जखमी

झोक्यात तीनही मुली खेळत असतानाच अचानक साडीचा झोका तुटला. यात अर्चना पावरा या दीड वर्षाच्‍या बालिकेचा मृत्यू झाला. तर तिच्या साडेतीन वर्षे व पाच वर्ष वयाच्या दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या. दोघींवर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. मयत अर्चना हिच्यावर सायंकाळी सावदे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना पहिल्यापासूनच विद्यार्थ्यांच्या सोबत; सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली - उद्धव ठाकरे

Devisha Shetty: 'हिंसाचार म्हणजे लोकशाही नाही', सूर्यकुमार यादवच्या पत्नीची पोस्ट चर्चेत; CJP आंदोलनावर स्पष्ट केली भूमिका

Kanda Bhaji Recipe : १ थेंबही तेल न वापरता बनवा कुरकुरीत कांदा भजी, वापरा 'ही' सिक्रेट ट्रिक

Gold Price Today : सोनं खरेदी करायचंय? थांब आधी आजचे दर पाहा! सलग तिसऱ्या दिवशी किमतीत मोठा बदल

कमी वेळात झटपट बनवा नाश्त्याच्या 5 सोप्या रेसिपी, ऑफिससाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT