Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

Eknath Khadse: शिंदेच्‍या सेनेला मतदारांनी नाकारलेय; मुक्ताईनगरमधील ग्रामपंचायतींच्‍या विजयानंतर खडसेंची प्रतिक्रिया

शिंदेच्‍या सेनेला मतदारांनी नाकारलेय; मुक्ताईनगरमधील ग्रामपंचायतींच्‍या विजयानंतर खडसेंची प्रतिक्रिया

साम टिव्ही ब्युरो

मुक्‍ताईनगर (जळगाव) : मुक्ताईनगर मतदार संघांमध्ये शिंदे गटाच्‍या सेनेचा आमदार आहे. तरी देखील एकाही ग्रामपंचायतीवर (Gram Panchayat) शिंदे गटाच्‍या सेनेचा झेंडा फडकला नाही. अर्थात मतदारांनी शिंदे सेनेला नाकारलेले असून राष्‍ट्रवादीच्‍या (NCP) पाठीशी उभे असल्‍याची प्रतिक्रीया आमदार एकनाथ खडसे यांनी दिली. (Tajya Batmya)

मुक्ताईनगर (Muktainagar) विधानसभा क्षेत्रातील १३ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. या विजयानंतर खडसे (Eknath Khadse) यांनी माध्‍यमांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेस व नाथाभाऊंवर मतदारांनी विश्वास दाखवल्‍याचे सांगितले.

एका पराभवाने नाथाभाऊ संपलेला नाही

दूध संघामध्ये आमच्या पॅनलचा पराभव झाला, म्हणून नाथाभाऊ संपले अशी आवळी उठवली जात होती. जनतेतून निवडून आलेले हे सरपंच आहेत. यामध्ये सहा ते सात ग्रामपंचायती मोठ्या आहेत. त्यामुळे हे सिद्ध झाले की मुक्ताईनगरमधील मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे; अशी प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT