Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

वेदांत प्रकल्प गुजरातकडे वळविणे हा महाराष्ट्रावर अन्याय; एकनाथ खडसे यांची राज्य सरकारवर टीका

वेदांत प्रकल्प गुजरातकडे वळविणे हा महाराष्ट्रावर अन्याय; एकनाथ खडसे यांची राज्य सरकारवर टीका

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : या प्रकल्पामुळे राज्याची जी आर्थिक उलाढाल आहे. त्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली असती. राज्याचा जीडीपी दर वाढला असता. प्रत्यक्ष उत्पन्न वाढले असते; लाखो तरुणांना यामुळे रोजगार मिळाला असता. मात्र हा प्रकल्प (Gujrat) गुजरातकडे वळविल्याने या सर्वांपासून महाराष्ट्र वंचित राहणार आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास कारणीभूत ठरणारा वेदांत प्रकल्प गुजरातकडे वळविण्यात आल्‍याने महाराष्ट्रावर अन्याय असून राज्यासाठी मोठी दुर्देवी बाब असल्‍याी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे. (Jalgaon News Eknath Khadse)

सदर प्रकल्‍पासाठीची सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात हा असतांना प्रकल्प गुजरातकडे वळविला गेल्यात यात मोठे राजकारण असल्‍याचेही खडसे म्हणाले. अजूनही वेळ गेलेली नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय असून यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांची भेट घ्यावी’ असेही खडसे म्हणाले.

तर मुख्‍यमंत्र्यांचा गौरव होईल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले होते, की ते मोदींचे हस्तक असून काम करतोय. मात्र हस्तकाचे काम महाराष्टातील प्रकल्प गुजरातकडे वळविण्याचे नव्हे; तर तोच प्रकल्प इकडे आणला तर मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण महाराष्ट्र गौरव करेन असा निशानाही एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर साधला. अजूनही वेळ गेलेली नाही. राज्य सरकारने प्रतिष्ठा पणाला लावून हा प्रकल्प पुन्हा राज्याकडे आणावा असेही खडसे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावले तर आनंद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर येत असून यावर विचारले असता खडसे म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यांचे मी स्वागत करतो मात्र हिंदू गर्जना यात्रेच्या निमित्ताने येताहेत की, स्थानिक आमदारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येत आहेत. विकासकामांचा भूमीपूजन करण्यासाठी येत आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ज्या कारणांसाठी येत आहेत त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आता मुक्ताईनगरचे असो की जिल्ह्यातील इतर रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत; अशी अपेक्षाही खडसेंनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT