Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

Eknath Khadse: मिटवायचे काहीच राहिले नाही, सर्व तर सुरू आहे; खडसेंचा पलटवार

मिटवायचे काहीच राहिले नाही, सर्व तर सुरू आहे; खडसेंचा पलटवार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मिटवून टाका वगैरे असा मी बोललो नाही. मला त्रास देणं सुरू असले तरी मी सर्व विषयांना टक्कर देणार. मिटवायचे कोणते राहिले; सर्वच तर सुरू आहे. ईडी, सीबीआय, अँटी करप्शन सर्व ठिकाणी त्रास देणे सुरू असताना मिटवायचे तरी काय? असा पलटवार (Eknath Khadse) एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांच्‍या (Girish Mahajan) वक्तव्यावर लगावला आहे. (Jalgaon Eknath Khadse News)

अमित शहा, फडणवीसांची भेट घेणार

गिरीश महाजन यांनी रक्षा खडसेंनी (Raksha Khadse) आपल्याला सांगितल्याचे म्हटले. मात्र अशी कुठलीही चर्चा रक्षा खडसेसोबत केली नाही. पुढच्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार होतो. मात्र ते फॉरेनला गेल्याने व त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असल्याने भेट झाली नाही. पुढील काळात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या समवेत अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्‍याचे देखील खडसेंनी स्‍पष्‍ट केले. भेटीमध्ये राजकीय विषय नाही. मात्र भेटीचे कारण सांगणे खडसेंनी टाळले.

मी ५० खोके घेणारा माणूस नाही

अमित शहा यांची भेट घेण्यासंदर्भात शरद पवार यांना कल्‍पना दिली होती. भेट होवू न शकल्‍याने आता अमित शहा यांची भेट घेणार असून त्‍यावेळी शरद पवार हे देखील सोबत राहणार आहेत. शरद पवार माझ्यासोबत असल्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये मी पन्नास खोके घेऊन जाणारा माणूस नाही; असेही खडसेंनी स्‍पष्‍ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT