Gold Silver Price, Gold rate today, Gold price Today,  Saam tv
महाराष्ट्र

चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनेही एक हजाराने डाऊन

चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनेही एक हजाराने डाऊन

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला चांदीच्या दरात चार हजारांची घसरण झाली होती. ६९ हजारांवरून ६५ हजारांपर्यंत चांदीचे दर गडगडले होते. आज आठ दिवसांनी चांदीच्या दरात पुन्हा तीन हजारांची घसरण झाली आहे. ६५ हजारांपर्यंत असलेली चांदी ६२ हजारांवर येऊन ठेवली आहे. सोन्याचे दर ५२ हजार (प्रतीतोळा) होते तेही ५१ हजारांपर्यंत खाली आले आहेत. यामुळे सोने, चांदीत (Gold And Silver) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अधिकच चांगली संधी उपलब्ध झाली आहे. (jalgaon news drop in the price of silver Gold down by a one thousand)

गेल्या आठ दिवसात चांदीच्या दरात ६५ हजारांवरून ६२ हजारांपर्यंत घसरण झाली आहे. तर सोन्याच्या दर ५२ हजारांवरून ५१ हजारावर आले. सोन्याच्या (Jalgaon News) दरात एक हजारांची घसरण झाली. अक्षय तृतीयेला सोन्याला चांगली मागणी होती. यामुळे कोट्यवधीची तेव्हा झाली. आता सोने, चांदीचे दर उतरल्याने पुन्हा सोन्या, चांदीला अधिक मागणी असणार आहे. (Gold rate today)

युद्धात शिथिलत येताच घसरण

दोन महिन्यापूर्वी (Russia) रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात सातत्याने ८ मार्चपर्यंत वाढ होत गेली. नंतर मात्र युद्धात शिथिलता येताच सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. मागील महिन्यात सोन्याच्या दरात २७०० ची तर चांदीच्या दरात २ हजारांची घसरण झाली होती. युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात तीन ते चार हजारांची वाढ झाली होती. चांदीच्या दरात नऊ हजारांची वाढ झाली होती. याचा फायदा अनेक गुंतवणूकदारांनी घेतला. सोन्या, चांदीची मोड विकून नफा कमविला आहे. आता दर उतरल्याने नागरिक सोने, चांदी अधिक प्रमाणात विकत घेऊन गुंतवणूक करतील असा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

SCROLL FOR NEXT