Jalgaon Shiv Sena News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Shiv Sena News: गुलाबरावांचा मुखडा घालून समर्थक सभेला रवाना; गुलाबराव बाहुबलीच्‍या रूपात

गुलाबरावांचा मुखडा घालून समर्थक सभेला रवाना; गुलाबराव बाहुबलीच्‍या रूपात

संजय महाजन

जळगाव : माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाचोरा (Pachora) येथे आज सभा होत असून या सभेपुर्वी वातावरण चांगलेच तापलेले पहावयास मिळत आहे. सभेत घुसून दाखवा असे आव्‍हान दिल्‍यानंतर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे समर्थक त्‍यांचा मुखवटा घालून पाचोरा येथे रवाना झाले आहेत. (Tajya Batmya)

माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जळगाव (Jalgaon) जिल्हा दौऱ्यावर असून आज (२३ एप्रिल) त्‍यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे विराट सभा होणार आहे. या सभेपुर्वी संजय राऊतांनी या सभेत चौकटीत राहून बोलावे, अन्यथा सभेत घुसणार. असं थेट आव्हान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले होते. यावरून संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर देत सभेत घुसून दाखवा असे आव्‍हान दिले आहे. यानंतर गुलाबराव पाटील यांच्‍या समर्थकांनी गुलाबराव पाटील यांचा मुखवटा घालून पाचोरा येथे रवाना झाले आहे.

गुलाबराव बाहुबलीच्‍या रूपात

पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांची सभा सायंकाळी आहे. या सभेपुर्वी जिल्‍ह्यातील वातावरण चांगलेच तापलेले असून गुलाबराव पाटील यांचे समर्थक देखील सभेला रवाना झाल्‍याचे पहावयास मिळाले आहे. समर्थकांनी गुलाबराव पाटील यांचा मुखडा परिधान केला असून गाडीच्‍या पुढे गुलाबराव पाटील यांचे बाहुबलीच्‍या रूपातील कटआऊट लावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: चहूबाजूंनी होईल पैशाचा वर्षाव, 5 राशीं होणार मालामाल, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Chanakya Niti: या ५ गोष्टी करायला लाजताय? आत्ताच सोडा ही सवय अन्यथा आयुष्यभर येईल डोक्याला हात लावण्याची वेळ

हे काय? बाळाला चक्क दोन लिंग, महिलेच्या प्रसृतीनंतर डॉक्टरही चक्रावले

Maharashtra Live News Update: परळीच्या निवडणुकीमध्ये न्यायालयाकडून शरद पवार गटाला मोठा दिलासा

Supreme Court: निवडणुका रद्द करू नाहीतर निकाल आम्ही देऊ: सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT