Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: जिल्हा दूध संघ निवडणूक स्‍थगित; २० डिसेंबरनंतर प्रक्रिया

जिल्हा दूध संघ निवडणूक स्‍थगित; २० डिसेंबरनंतर प्रक्रिया

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : राज्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसेच सहकारी संस्थांच्याही निवडणुका (Election News) आहेत. दोन्हीचे कार्यक्षेत्र ग्रामीण भाग असल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे आता जळगाव (Jalgaon) जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित झाली असून २० डिसेंबरनंतर प्रक्रियेला पुन्हा प्रारंभ होईल. (Letest Marathi News)

राज्याचे सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागातर्फे राज्याचे विशेष कार्यकारी अधिकारी, सहनिबंधक सहकारी संस्था यांनी आज (ता.२९) हे आदेश जारी केलेत. या आदेशात त्यांनी म्हटले आहे, की राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामंपचायतीचा (Gram Panchayat) निवडणूक कार्यक्रम १८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत जाहीर करण्यात आला आहे. तसेच राज्यातील ७ हजार १४७ सहकारी संस्थाचा निवडणूक कार्यक्रम देखील सुरू करण्यात आला आहे. यात ‘अ’ वर्ग ३८, ‘ब’ वर्ग ११७०, ‘क’ वर्ग ३१५१ व ‘ड’ वर्गातील २७८८ संस्था आहेत.

सहकारी संस्था निवडणुका पुढे

ग्रामपंचायत व सहकारी संस्था निवडणुका एकाच वेळी आहेत. दोन्हीचे क्षेत्र ग्रामीण आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही क्षेत्रातील बरेचशे मतदार हे ग्रामीण भागातील असल्याने ते मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दोन्ही निवडणुकीत मतदारांना सहभाग नोंदविता यावा यासाठी शासनाच्या अधिकारात राज्यातील ‘अ’ व ‘ब’ वर्गातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहे.

२० डिसेंबरनंतर प्रक्रिया

अध्यादेश जारी झालेल्या तारखेपासून आहे, त्या टण्यावर निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहे. २० डिसेंबर २०२२ नंतर आहे, त्या टप्प्यापासून ही निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू करण्यात येईल. जळगाव जिल्हा दूध संघ संचालकपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया चिन्हापर्यंत आलेली आहे. उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात आली आहेत. यापुढे मतदानाची प्रक्रिया. २० डिसेंबरनंतर पुढे ही प्रक्रिया सुर करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे निंबाळकर यांचे बार्शीमध्ये स्वागत

Upma Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट उपमा; वाचा सोपी रेसिपी

शेकाप-भाजप-राष्ट्रवादी एकत्र आले, तरीही शिंदेसेना जिंकली; विजयाचा झेंडा फडकवत प्रतिष्ठा राखली

ENG vs IND : वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, गौतम गंभीरच्या विश्वासूला संघात स्थान; विराटचं कमबॅक झालं का?

IRCTC Waiting Ticket Rules: वेटिंग तिकीटवाल्यांना मोठा दिलासा! रेल्वे आणतेय 'हा' नवा नियम

SCROLL FOR NEXT