Ration Card 
महाराष्ट्र

नाल्यात आढळून आले ३५ ते ४० रेशन कार्ड

नाल्यात आढळून आले ३५ ते ४० रेशन कार्ड

संजय महाजन

जळगाव : रेशन कार्ड मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. मात्र जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे धरणी नाल्यात ३५ ते ४० केसरी रेशन कार्डचा गठ्ठा आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (jalgaon-news-dharangaon-ration-cards-were-found-in-dharni-nala)

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे धरणे नाल्यात केशरी रेशन कार्ड आढळून आले आहे. मात्र हे रेशन कार्ड कोणी व का फेकले? याबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. तरी धरणगाव येथील भाजपचे पदाधिकारी संजय पाटील यांनी घटनास्थळावरून तहसीलदारांची संपर्क साधला असता याप्रकरणी चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तर रेशन दुकानदाराने हे रेशन कार्ड नाल्यात फेकून दिल्याचा अंदाज देखील वर्तविण्यात येत आहे.

लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्‍न?

केशरी रेशन कार्ड धारकांना शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ मिळत असतो. मात्र रेशन कार्ड नाल्‍यात पिशवीत बांधून फेकल्‍याचा प्रकार समोर आला. तसेच अनेक रेशन कार्ड नाल्यात वाहून गेल्याचा अंदाज असून लाभाथ्‍र्यांना लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्‍न केला जात असल्‍याची शंका व्‍यक्‍त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT