ATM  
महाराष्ट्र

चक्क चोरट्यांनी एटीएम मशीनच पळविले.. जळगाव रोडवरील घटना

चक्क चोरट्यांनी एटीएम मशीनच पळविले.. जळगाव रोडवरील घटना

Rajesh Sonwane

जळगाव : धानोरा (ता.चोपडा) येथे चोरट्यांनी हद्दच केली. इंडीकॅश बँकेचे एटीएम फोडून चोरी करण्याच्या इराद्याने आलेल्या चोरांना एटीएम मशीन फोडता आले नसावे; त्यामुळे चक्क एटीएम मशीनचीच चोरी केली. वाढत्या चोरी आणि दरोडेखोरीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (jalgaon-news-dhanora-village-grampanchayat-complex-thieves-stole-ATM-machine)

अंकलेश्वर– बऱ्हाणपूर महामार्गावर असलेल्या धानोरा (ता.चोपडा) येथील ग्रामपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या इंडीकॅश बॅंकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळविले आहे. पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरांना एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे चोरांनी चक्क एटीएम मशीनच चोरुन नेले. ही घटना बुधवारी (ता.२०) मध्यरात्री घडली. गुरुवारी (ता.२१) सकाळी गावातील पोलिस पाटील दिनेश पाटील यांनी घेतनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

दीड– दोन लाखाची कॅश

एटीएममध्ये अंदाजे दीड– दोन लाख रुपयांची रक्कम असल्याचे समजते. तर जवळपास असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री दोन वाजेच्या सुमारास एक मोठा ट्रक या रस्त्यावरून गेल्याचे दिसत असल्याने यातच एटीएम मशीन टाकून नेल्‍याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सुरक्षारक्षकाच नाही

अनेकवेळा याच ठिकाणचे एटीएम मशीन फोडण्याचे प्रकार झाले आहेत. विशेष म्हणजे अद्यापही त्या चोरीचा तपास लागलेला नाही. चोरीच्या या प्रकारानंतर देखील बॅंकेच्या व्यवस्थापनाकडून या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली नाही. तसेच एटीएमच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधीची तक्रार दाखल करण्यास असमर्थता दर्शवली केली असल्याचेही समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Puri Recipe: मुंबईची स्पेशल चटपटीत दही पुरी कशी बनवायची? सोपी रेसिपी वाचा

Summer Hairstyles: उन्हाळ्यात घामामुळे केस खराब होतात? या 5 ट्रेंडी हेअरस्टाईल्स करा

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी मोठ्या हालचाली; शरद पवार मैदानात?, VIDEO

Maharashtra Live News Update : वाशिममध्ये शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला

बारामती पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान|VIDEO

SCROLL FOR NEXT