Corona Update Saam tv
महाराष्ट्र

Corona Update: चाचण्या घटल्याने रुग्णसंख्या कमी; जळगाव जिल्ह्यात नवे ८० बाधित

चाचण्या घटल्याने रुग्णसंख्या कमी; जळगाव जिल्ह्यात नवे ८० बाधित

संजय महाजन

जळगाव : दोन दिवस कोरोनाचा विस्‍फोट झाल्‍यानंतर सोमवारी काही प्रमाणात दिलासा मिळाला. सोमवारी दिवसभरात ८० रुग्ण आढळून आले. मुळात चाचण्या कमी झाल्‍यामुळे रुग्णसंख्‍या कमी आली आहे. त्यात जळगाव (Jalgaon) शहरात १६ नवे रुग्ण आढळून आले. तर एक रुग्णाने कोरोनाला (Corona) मात दिली. (jalgaon news corona news update)

राज्‍यात ओमायक्रॉन (Omicron) व डेल्टा व्हेरीएंटचे रुग्ण झपाट्याने आढळून येत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पटने वाढली होती. रविवारी तर जिल्ह्यात १७९ रुग्ण आढळून आले. त्यात जळगाव शहरात ६४ तर भुसावळ (Bhusawal) शहरात ७३ नवे रुग्ण आढळून आले होते. सोमवारी मुळातच कमी चाचण्या झाल्यामुळे रुग्णसंख्या कमी दिसून येत आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण ५५२ झाले असून पैकी केवळ २५ रुग्णांनाच लक्षणे आहेत.

सक्रीय रुग्ण पाचशेवर

जळगाव जिल्ह्यातही कोरोनाच्या (Jalgaon Corona Update) नव्या रुग्णांचा उद्रेक होत आहे. गेल्या चार- पाच दिवसांपासून रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. अवघ्या आठवडाभरात सक्रिय रुग्णसंख्या दहावरुन पाचशेवर पोचली आहे. सोमवारी अवघ्या ४०७ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी तब्बल ८० रुग्ण बाधित आढळून आले. म्हणजे पॉझिटिव्हीटी रेट तब्बल २० टक्के आहे. नव्या ८० रुग्णांमुळे सक्रिय रुग्णसंख्या ५५२ झाल आहे. पैकी ५२७ रुग्ण लक्षणे नसलेले आहेत.

मागील आठवड्यातील कोरोना रुग्ण

३ जानेवारी.... १६

४ जानेवारी... ९३

५ जानेवारी... ३९

६ जानेवारी.... ४६

७ जानेवारी.... ८८

८ जानेवारी.... ८७

९ जानेवारी.... १७९

१० जानेवारी... ८०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tringalwadi Killa : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? त्रिंगलवाडी किल्ला ठरेल बेस्ट

Karishma Kapoor: ५१ वर्षांच्या करिश्माचा काय आहे स्किन केअर सिक्रेट; जाणून घ्या

Maharashtra Politics : शिंदे गटाला भाजपकडून धक्का! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कोणाचा हात? शिवराज बांगर यांनी केला धक्कादायक आरोप

ठाकरे बंधू एकत्र आल्याचा धसका, CM फडणवीसांनी सांगितला निवडणूक प्लान | VIDEO

SCROLL FOR NEXT