Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: आजोबा घरी आले नातीला पाहून बसला धक्‍का; गळ्यात दोर आवळून तरुणीचा मृत्‍यू

आजोबा घरी आले नातीला पाहून बसला धक्‍का; गळ्यात दोर आवळून तरुणीचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : महाबळ परिसरात घरातील झोक्याची दोरी गळ्यात आवळल्याने १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू (Death) झाला. झोक्यावर स्टंटबाजी करताना ही दुर्घटना घडली. विधी पाटील (वय १८), असे मृत तरुणीचे नाव आहे. (Live Marathi News)

जळगाव (Jalgaon) शहरातील महाबळ कॉलनीत पोलिस चौकीमागील गल्लीत विधी पाटील आई तेजस्विनी, वडील स्वप्नील पाटील, आजोबासह वास्तव्याला होती. ती बारावीचे शिक्षण (Education) घेत होती. तिचे आई- वडील संगणक क्लास चालवतात. मंगळवारी (२८ नोव्‍हेंबर) सायंकाळी घरात कोणीही नसताना विधी दुसऱ्या मजल्यावरील नायलॉन दोरीच्या झोक्यावर बसली होती. झोका घेत असताना, अचानक नॉयलॉन दोरीचा विधीच्या गळ्याला फास आवळला जाऊन तिचा जीव गुदमरला. त्यावेळी घरात कुणीही नसल्याने दोरीचा गळफास लागल्याने तिचा मृत्यू झाला.

आजोबा घरी आले अन्‌

तिच्या आजोबांनी तिच्या मोबाईलवर कॉल केला. मात्र, कॉल उचलत नसल्याने ते घरी आले. वरच्या मजल्यावर विधीला झोक्याचा गळफास लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला. विधीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. विधी एकुलती एक मुलगी असल्याने कुटुंबीयांवर संकट ओढवले आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक प्रशांत पाठक, ज्ञानेश्वर पाटील तपास करीत आहेत.

स्टंटबाजी बेतली जिवावर

विधी निवांत असताना याच झोक्यावर खेळत असे. घरात सर्वांदेखत झोक्याचे स्टंट ती करत होती. झोक्याशेजारीच असलेल्या कॉटवरून उडी घेत ती अलगद झोक्यावर बसायची अन्‌ झोक्यातून चालता-चालता उतरायची. घरात कोणीही नसताना विधी वरच्या मजल्यावर एकटीच झोक्यावर होती. तिने नेहमीच्या सवईप्रमाणे कॉटवरून उडी घेत झोक्यावर बसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा अंदाज चुकून ती सटकली अन्‌ नेमके त्याच वेळेस झोक्याची दोरी तिच्या गळ्याभवती अडकल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज घटनास्थळी पंचनामा करणाऱ्या पोलिसांसह कुटुंबियांनी वर्तविला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT