online fraud 
महाराष्ट्र

२५ लाखांची लागली लॉटरीचे नाव अन्‌ महिलेची ऑनलाइन फसवणूक

२५ लाखांची लागली लॉटरीचे नाव अन्‌ महिलेची ऑनलाइन फसवणूक

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कौन बनेगा करोडपतीची २५ लाखांची लॉटरी लागली आहे; अशी सांगत रांजनगाव (ता.चाळीसगाव) येथील महिलेची २ लाख ९२ हजार ७०९ रुपयांत (Online fraud) ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात (Cyber Crime) गुन्हा दाखल झाला आहे. (jalgaon-news-cyber-crime-Lottery-worth-25-lakh-and-online-fraud-of-a-woman)

राजनगाव येथील शबानाबानो शेख सादीक (वय ४०) यांना ८ नोव्हेंबरला अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. फोनवर बोलणार्‍या संबंधितांने शबानोबानो यांना तुम्हाला २५ लाख रुपयांची कौन बनेगा करोडपतीची लॉटरी लागल्‍याचे सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या नंबरवरुन वेगवेगळ्या नावांनी संबंधितांनी फोन करुन शबानोबानो यांचा विश्‍वास संपादन केला.

टप्‍प्‍याटप्‍प्‍याने पाठविली ऑनलाइन रक्‍कम

लॉटरी लागलेले २५ लाख रुपये मिळविण्यासाठी इन्कम टॅक्स व इतर चार्जेसच्या नावाखाली शबानोबानो यांना ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार शबानोबानो यांनी संबंधितांना दहा दिवसात २ लाख ९२ हजार ७०९ रुपये ऑनलाईन पाठविले. पैसे स्विकारल्यानंतर शबानोबानो यांना कुठल्याही प्रकारचे लॉटरी लागल्याचे पैसे मिळाले नाही.

सायबर पोलिसात गुन्‍हा दाखल

रक्‍कम मिळाली नसल्‍याने आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्‍यावर शबानोबानो यांनी बुधवारी (१७ नोव्हेंबर) जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या क्रमाकांवरुन फोन करणार्‍या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT