Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: वीज बिल भरायची बनावट लिंक पाठवून ४ लाखाची फसवणूक

वीज बिल भरायची बनावट लिंक पाठवून ४ लाखाची फसवणूक

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : अनोळखी नंबरवरून फोन आल्‍यावर वीज बिल भरण्यासाठी बनावट लिंक पाठविली. लिंक ओपन करताच जळगावातील व्‍यापारी असलेल्‍या इसमाच्‍या (Bank) बँक खात्यातून ३ लाख ९६ हजार ६०९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जळगाव सायबर पोलीस (Cyber Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Cyber Crime News)

सायबर विभागातून मिळालेल्या माहितीनुसार (Jalgaon) जळगाव शहरातील वैभव कॉलनीत वास्‍तव्‍यास असलेले जगदीश प्रितमदास जेठवाणी (वय ४०) यांची ऑनलाईन फसवणूक (Cyber Crime) झाली आहे. ते व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. १७ ऑगस्टला सायंकाळी ४.३० ते ७ वाजेच्‍या दरम्यान जगदीश यांच्या पत्नीच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून व्हॅाटस्ॲप मॅसेज आला. त्या क्रमांकावर जगदीश जेठवाणी यांनी कॉल केला असता आपण ईलेक्ट्रीक ऑफीसर असल्याचे सांगितले.

बनावट लिंकमधून घेतले बँक डिटेल

वीजबिल भरण्याचे सांगून जेठवाणी यांच्या मोबाईलवर बनावट लिंक पाठविली. दिलेल्या लिंकच्या माध्यमातून बँकेचे डिटेल्स घेवून त्यांच्या खात्यातून परस्पर ३ लाख ९६ हजार ६०९ रूपये वळविण्यात आले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जगदीश जेठवाणी यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून १८ ऑगस्टला वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT