crime news 
महाराष्ट्र

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी महिलेचा बळी; हत्येनंतर अर्धवट जळालेला मृतदेह नदीपात्रात

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी महिलेचा बळी; हत्येनंतर अर्धवट जळालेला मृतदेह नदीपात्रात

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शिवाजीनगरातील ५१ वर्षीय विवाहिता १५ डिसेंबरपासून बेपत्ता होती. शहर पोलिस दाखल तक्रारीवरून तपास करीत होते. चौकशीत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. माया दिलीप फरसे असे मृत विवाहितेचे नाव असून, पैशांचा पाऊस पाडण्यासाठी बळी दिल्यानंतर तिचा मृतदेह तापी नदीपात्रालगतच पुरण्यात आल्याचे आढळले आहे. तालुका पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत विच्छेदनासाठी रवाना केला आहे. (jalgaon-news-crime-news-Woman-victimized-for-raining-money-Partially-burned-body-in-river)

जळगाव (Jalgaon) शहरातील शिवाजीनगर परिसरातील क्रांती चौकातील रहिवासी माया फरसे कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. नातेवाइकांनी शोधाशोध केल्यानंतर त्या मिळून न आल्याने या प्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. माया बेपत्ता झाली नसून तिच्यासोबत काहीतरी विपरीत घडल्याची तक्रार देत नातेवाइकांनी दोघांवर संशय व्यक्त केल्याने सोमवारी (ता. २०) सकाळी निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक गबाळे, उपनिरीक्षक अरुण सोनार, उपनिरीक्षक क्षीरसागर, भास्कर ठाकरे, रतन गिते यांच्या पथकाने मांत्रिक संतोष मुळीक व त्याचा साथीदार अमोल दांडगे या दोघांना ताब्यात घेतले. पोलिस (Police) प्रसाद दिल्यानंतर दोघांनी घटनेचा उलगडा करत विदगाव येथील तापी नदीत मृतदेह फेकल्याचे सांगितल्यानंतर तालुका पोलिसांसह शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह अर्धवट जळालेला

अटकेतील संशयितांनी माया फरसे या महिलेचा दोरीने गळा आवळून नंतर तोंडाला बांधलेल्या स्कार्फवर पेट्रोल टाकून मृतदेह पेटवून देण्यात आला. मात्र, मृतदेह पूर्ण न पेटल्याने तो संशयितांनी नंतर तापी नदीच्या पात्रात तसाच फेकून पलायन केले.

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी

मिळालेल्या माहितीनुसार नातेवाईक असलेल्या तरुणाला एका मांत्रिकाने ‘तुला भरघोस पैसे मिळतील, आपल्याला पैशांचा पाऊस पाडायचा आहे. मात्र, त्यासाठी एका महिलेचा बळी द्यावा लागेल’ असे सांगितले होते. मांत्रिकाच्या सांगण्यावरून तरुण महिलेला घेऊन गेला. विदगाव पुलाजवळ तापी नदीपात्रालगत अघोरी विधी आटोपल्यानंतर मायाचा बळी दिल्याचा संशय असून, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. शहर आणि तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मृतदेह बाहेर काढत जिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी रवाना केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

महायुतीत बंडखोरी? सामंतांच्या निकटवर्तीय नेत्यानं थोपटले दंड; शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

Monday Horoscope : पैसा, करिअर आणि व्यवसायात मोठी संधी; ‘या’ 6 राशींचे नशीब उजळणार

तुम्हीही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय? मग ही बातमी नक्की वाचा! 1 जानेवारीपासून नवा नियम येणार

SCROLL FOR NEXT