Crime News saam tv
महाराष्ट्र

Crime News: मुलाने आईवर केला चाकूने वार

मुलाने आईवर केला चाकूने वार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : घरगुती भांडणातून मुलाने आईला चाकू मारुन जखमी केल्याची घटना शहरातील पिंप्राळा हुडको येथे घडली आहे. याप्रकरणी मुलाविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. (jalgaon news crime news The boy stabbed the mother)

रामानंद पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, शमीम बानो शेख पिरन (वय ४०) या जळगाव (Jalgaon) महापालिकेच्या दवाखान्याच्या मागे पिंप्राळा हुडको परिसरात राहतात. याच ठिकाणी त्यांचा मुलगा तन्वीर शेख जलील (वय २३) हा देखील राहतो. रविवार (९ जानेवारी) घरात किरकोळ वाद झाला.

जीवे मारण्याची धमकी

घरगुती भांडणाच्या कारणावरून तन्वीरने आई शमीम हिच्या उजव्या हातावर भाजी कापण्याचा चाकू मारून दुखापत (Crime News) केली. तसेच मारून टाकण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या शमीम बानो शेख पिरन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचा मुलगा तन्वीर शेख जलील याच्या रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT