जळगाव : मजूरी करून मेहनतीने जमविलेली रक्कम अगदी क्षणार्धात गेली. पोस्ट ऑफिसच्या खात्यातून पैसे काढून बँकेत जात असलेल्या वृद्धाची पिशवी कापून लाख रुपये लांबवल्याची घटना आज घडली.
जळगाव (Jalgaon) शहरातील रामेश्वर कॉलनीमधील रहिवाशी असलेले देवराम बाबुलाल चौधरी (वय ७२) हे आज पोस्ट कार्यालयात आले होते. पैसे काढून बाहेर आल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी रक्कम लंपास केली. मजुरी करून उदरनिर्वाह करत शिल्लक रक्कम पोस्टाच्या बचत खात्यात जमा करत असतात. परंतु, चोरट्यांनी काही वेळातच चौधरी यांनी मेहनतीने जमविलेली रक्कम लांबविल्याने चौधरींच्या पायाखालची जमीनच सरकली.
व्याज कमी म्हणून काढली रक्कम
जळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यात एक लाख रुपये बचतीतून जमवले होते. पोस्टातील बचत खात्यात व्याज कमी मिळते म्हणून त्यांना ते पैसे इतर बँकेतील खात्यात टाकायचे होते. त्यासाठी ते आज पोस्ट ऑफिसमध्ये आले. सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी पैसे काढले.
मशीन खराब असल्याने पैसे मोजत बसले अन्
पैसे काढल्यावर पोस्टातील रोखपाल महिलेला त्यांनी ही एक लाखाची रक्कम मशीनवर मोजून दाखवायला सांगितले. परंतु, पैसे मोजलेले आहेत आणि नोटा मोजायचे मशीन खराब झाले असल्याने महिला कर्मचारीने सांगितले. त्यामुळे बाहेर जाण्यापुर्वी पैसे मोजून घेवू म्हणून ते वीस मिनिटे पोस्ट कार्यालयातच नोटा मोजल्या. नोटा मोजून झाल्यावर त्यांनी सदरची रक्कम पिशवीत टाकली व ते बाहेर निघाले. याच दरम्यान चोरट्यांनी संधी साधून पिशवी कापूस रक्कम लांबविली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले असून तपास सुरू आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.