Crime News 
महाराष्ट्र

जामीनावर सुटताच भावाच्या खुन्याला संपवले

जामीनावर सुटताच भावाच्या खुन्याला संपवले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात गेल्या वर्षभरापासुन कारागृहात असलेल्या धम्मप्रिय मनोहर सुरळकर(वय-२४रा.पंचशील नगर भुसावळ) आज जामीन झाला. कारागृहातून सुटल्यावर मुलगा धम्मप्रीयला घेवुन मनोहर सुरळकर दुचाकीने भुसावळला घरी जात असतांना पाळतीवर असलेल्या देाघा मारेकर्यांनी नशिराबाद फ्लायओव्हरच्या खालीच पितापुत्रावर गोळीबार आणि चाकु हल्ला चढवला. यात धम्मप्रीयला जागीच मृत्यु ओढवला तर गंभीर जखमी मनोहर सुरळकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यातील दोघे मारेकरी नशिराबाद पेालिसांत स्वतःहुन हजर झाले. (jalgaon-news-crime-news-nashirabad-bridge-fire-in-late-night)

भुसावळ येथील पंचशिल नगर भागात पूर्ववैमनास्यातून मोहम्मद कैफ शेख जाकीर याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याचा खून केल्याची घटना गेल्यावर्षी (११ ऑक्टोबर २०२०) रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली होती. मयताचा मोठा भाऊ शेख समीर शेख जाकीर (रा. पंचशील नगर, मदिना मशीद जवळ भुसावळ) याच्या फिर्यादीवरुन गुन्ह्याची नोंद होऊन त्यात धम्मप्रीय ऊर्फ धम्मा मनोहर सुरळकर याला अटक करण्यात आली. अटके पासून तो, जळगाव कारागृहात न्यायालयीन कोठडीतच होता. आज जिल्‍हा न्यायालयाने त्याची जामीनावर मुक्तता केल्यावर संध्याकाळी धम्मप्रीय ऊर्फ धम्मा याला घेवुन जाण्यासाठी वडील मनोहर सुरळकर न्यायालयाचे आदेश घेवुन आले. कारागृहातून संध्याकाळी बाहेर पडल्यावर वडीलांसह दुचाकीने भुसावळला घराकडे दोघेही बाप-लेक निघाले होते. नशिराबाद जवळ एका पान टपरीवर गुटख्याची पुडी घेवून दुचाकीने निघाल्यावर फ्लायओव्हरच्या खालीच दुचाकीवरुन आलेल्या समीर शेख जाकीर आणि त्याचा एक साथीदार अशांनी दुचाकी अडवुन धम्मप्रीय याच्यावर अंधाधुंद गोळीबार करायला सुरवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यातून सावरण्यापुर्वीच खाली पडलेल्या धम्मप्रीय व त्याच्या वडीलांवर दोघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला.यात धम्मप्रीय याचा जागीच मृत्यु झाला.

डेाळ्यात तिखट फेकले..

धम्मप्रीय त्याचेवडील मनोहर सुरळकर यांची दुचाकी फ्लायओव्हर(अंडरपास) जवळ येण्यापुर्वी पासुन दबा धरुन बसलेल्या मारेकर्यांपैकी एकाने दोघांच्या डोळ्यात लालतिखड फेकले..गाडी थांबुन खाली कोसळण्यापुर्वीच समीर शेख व त्याच्या साथीदारांनी बेछुट गोळीबार केला. मुलास वाचवण्यासाठी मी, त्याच्या अंगावर पडलेा असता समीवर त्याच्या साथीदारांनी मलाही चॉपरने डोग्यावर मारल्याचे जखमी मनोहर सुरळकर यांनी सकाळशी बोलतांना सांगीतले.

पोलिसताफा दाखल..

गोळीबाराची घटना घडल्याचे कळताच सहाय्यक पेालिस निरीक्षक अनिल मोरे कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती वरीष्ठांना कळवल्याव अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ भागचे डीवायएसपी सोमनाथ वाक्चौरे घटनास्थळावर दाखल झाले. जखमींना सुरवातीला डॉ.उल्हास पाटिल वैद्यकीय महाविद्यालयात हलवले नंतर लगेच शासकिय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे हलवण्यात आले. जिल्‍हापेठ पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी जखमी मनोहर सुरळकर यांचा जबाब लिहून घेतला असून मयत धम्मप्रियचा मृतदेह शवागारात हलवण्यात येवुन जखमीवर उपचार सुरु होते.

असा होता वाद..

शेख समीर शेख जाकीर हा भुसावळ रेल्वेस्थानकावर खाद्यपदार्थ विक्री करतो, त्याच्याच गल्लीतील धम्मप्रीय ऊर्फ धम्मा सुरळकर, समीर ऊर्फ कल्लू बांगर, अश्विन ऊर्फ गोलू बांगर, शुभम खंडेराव यांच्याशी त्याचा वाद होता. ११ ऑक्टोबर २०२० रेाजी रात्री मदिना मशिदी जवळ समीरचा लहान भाऊ भाऊ मोहम्मद कैफ याला त्यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. मारहाणीत धम्माने लोखंडी रॉड मोम्मद कैफच्या डेाक्यात टाकल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला होता. भुसावळ मध्ये आजवर झालेल्या खुनी हल्यात बदल्यातून खुन करण्याचा हा चौथा प्रकार समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राळेगाव प्रकरणातील संशयित आरोपी मजहर कुरेशीच्या घरावर जमावाकडून दगडफेक

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

SCROLL FOR NEXT